पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न फसला; ४ दहशतवाद्यांना अटक, टार्गेट किलिंगचा होता प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 01:37 PM2023-10-28T13:37:30+5:302023-10-28T13:38:51+5:30
पंजाब पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ४ दहशतवाद्यांना अटक केली आहे.
पंजाबमधील मोहाली येथे पोलिसांनी बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या ४ दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या दहशतीचे मॉड्यूलही उघड केले आहे. पंजाबमधील वातावरण बिघडवण्यासाठी या दहशतवाद्यांना पाठवण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी त्यांना काही लोकांना टार्गेट किलिंगचे काम देण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दहशतवाद्यांचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी जोडले आहे.
कर्नाटक राज्याचे नाव बदला, काँग्रेस सरकारच्या मंत्र्याची मोठी मागणी; सुचवलं ऐतिहासिक नाव
बब्बर खालसा इंटरनॅशनल टोळीचे काही दहशतवादी मोहालीत लपल्याची माहिती पोलिसांना गुप्तचरांकडून मिळाली होती. पोलिसांनी तपास केला असता येथे ४ दहशतवादी लपून बसल्याचे कळले. पोलिसांनी तात्काळ अटक मोहीम सुरू करून चारही दहशतवाद्यांना अटक केली. दहशतवाद्यांकडून काही संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आली आहेत. त्यांना टार्गेट किलिंगसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या हरविंदर रिंडा या दहशतवादीच्या थेट संपर्कात असून तो त्यांना पूर्ण मदत करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आयएसआयच्या मदतीने हरविंदर रिंडा त्यांना शस्त्रे आणि आर्थिक मदत पाठवत होता. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून ६ पिस्तूल आणि २७५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ड्रोनच्या मदतीने पाकिस्तानकडून त्यांना शस्त्रे आणि आर्थिक मदत पाठवण्यात आली.
पंजाब पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून या बातमीची पुष्टी करणाऱ्या दोन पोस्ट केल्या आहेत. पंजाब पोलिसांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. याआधीही ड्रोनच्या साहाय्याने पंजाबमधील सीमेजवळ ड्रग्स आणि शस्त्रास्त्रांची पाठवण्यात आली असून, पोलिसांनी त्यांचे अनेक कट उधळून लावले आहेत. सध्या दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे.
In a major breakthrough, @sasnagarpolice has busted a terrorist module and arrested 4 operatives of outfit BKI (Babar Khalsa International)
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) October 28, 2023
The BKI module was tasked for targeted killings
Drones were used to smuggle weapons from #Pakistan (1/2) pic.twitter.com/u130Stc2ya