धडकी भरवणारे व्हिडीओ! जम्मू काश्मीरमध्ये कोसळला बर्फाचा कडा अन् क्षणात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:48 IST2025-03-05T19:47:02+5:302025-03-05T19:48:54+5:30

Avalanche in Sonamarg: जम्मू काश्मिरमधील सोनमर्ग जिल्ह्यात हिमस्खलन झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.  

An avalanche occurred in Jammu and Kashmir's Sonamarg, video goes viral | धडकी भरवणारे व्हिडीओ! जम्मू काश्मीरमध्ये कोसळला बर्फाचा कडा अन् क्षणात...

धडकी भरवणारे व्हिडीओ! जम्मू काश्मीरमध्ये कोसळला बर्फाचा कडा अन् क्षणात...

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन झाल्याची घटना घडली आहे. सोनमर्ग जिल्ह्यातील सरबलमध्ये ही घटना घडली असून, हिमस्खलन होतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. हे व्हिडीओ धडकी भरवणारे आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जम्मू काश्मिरसह शेजारील राज्यांत बर्फवृष्टी सुरू आहे. बर्फाचे मोठे थर जमा झाले असून, याचदरम्यान, सोनमर्ग जिल्ह्यात हिमस्खलन झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी हिमस्खलन झाले. अनेकांनी ही घटना कॅमेऱ्यातत कैद केली आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बर्फाचा कडा वेगाने खाली येतो आणि त्यानंतर प्रचंड मोठी लाट उसळल्यासारखा बर्फ हवेत उडतो. एका कारचालकाने कारमधून याचा व्हिडीओ शूट केला आहे. हिमस्खलनानंतर सगळीकडे बर्फच बर्फ दिसतो. समोरचं दृश्यही दिसत नाही.  

हिमस्खलनाचं दृश्य, व्हिडीओ बघा 

काश्मिरमधील हिमस्खलनाचा दुसरा व्हिडीओ

उत्तराखंडमध्ये घडली होती दुर्घटना

काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याची घटना घडली होती. हिमकडा बीआरओच्या कामगारांची छावणीवर कोसळला होता. या घटनेत ५७ लोक बर्फाखाली दबले होते. त्यातील अनेकांना वाचण्यात यश आले, तर आठ जणांचा मृत्यू झाला. 

Web Title: An avalanche occurred in Jammu and Kashmir's Sonamarg, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.