लेह, लडाख हादरले! पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 07:40 AM2023-12-26T07:40:07+5:302023-12-26T07:40:59+5:30
लेह आणि लडाख भागात मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.५ इतकी होती.
लेह, लडाखमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, लेह आणि लडाखमध्ये मंगळवारी पहाटे ४:३३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू ५ किमी खोलीवर होता आणि ३४.७३ अक्षांश आणि ७७.०७ रेखांशावर हादरे बसले. जम्मू आणि काश्मीरच्या जवळच्या किश्तवाड जिल्ह्यात ३.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. एनसीएसनुसार, किश्तवाडमध्ये सकाळी १.१० वाजता भूकंप ५ किमी खोलीवर झाला. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
“ख्रिश्चन समुदायाशी माझे जुने अन् जवळचे नाते, एक गोष्ट नक्कीच सांगेन की...”: PM मोदी
पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. हा ५० किलोमीटर जाडीचा थर अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे, याला टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. म्हणजेच पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग ७ टेक्टोनिक प्लेट्सने बनलेला आहे. या प्लेट्स कधीही स्थिर नसतात, त्या सतत फिरत राहतात, जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या दिशेने जातात तेव्हा ते एकमेकांवर आदळतात. अनेक वेळा या प्लेट्सही फुटतात. त्यांच्या टक्करमुळे, मोठ्या प्रमाणात ऊर्जा सोडली जाते ज्यामुळे परिसरात हालचाल होते. अनेक वेळा हे धक्के अत्यंत कमी तीव्रतेचे असतात, त्यामुळे ते जाणवतही नाहीत.
भूकंप पासून कसे वाचायचे?
भूकंपाचे धक्के जाणवल्यावर घाबरून जाण्याऐवजी सावधगिरी बाळगा आणि संयम बाळगा. भूकंपाचे धक्के जाणवत असतील तर सर्वप्रथम घरातून बाहेर पडून मोकळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. रस्ता अतिशय अरुंद असेल आणि दोन्ही बाजूला बहुमजली इमारती असतील तर बाहेर जाण्याचा काही फायदा होणार नाही. त्यानंतर घरात सुरक्षित ठिकाणी राहा. घराबाहेर पडायला बराच वेळ लागल्यास खोलीच्या कोपऱ्यात किंवा एखाद्या भक्कम फर्निचरखाली लपा.
An earthquake of magnitude 4.5 Richter Scale hit Leh, Ladakh at around 4:33 am today: National Center for Seismology pic.twitter.com/Fu8Mq5s439
— ANI (@ANI) December 26, 2023