आईच्या आठवणीत ८ वर्षाच्या मुलीनं लिहिलं भावूक पत्र वाचून वडील ढसाढसा रडले, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 05:41 PM2022-04-02T17:41:53+5:302022-04-02T17:42:39+5:30

श्यामभवी ही राजस्थानच्या दौसा येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर अर्चना शर्मा यांची मुलगी आहे

An emotional letter written by 8 year-old girl in memory of her mother Dr Archana Sharma, the father burst into tears after reading it | आईच्या आठवणीत ८ वर्षाच्या मुलीनं लिहिलं भावूक पत्र वाचून वडील ढसाढसा रडले, अन्...

आईच्या आठवणीत ८ वर्षाच्या मुलीनं लिहिलं भावूक पत्र वाचून वडील ढसाढसा रडले, अन्...

Next

दौसा – राजस्थानात चर्चेत असणाऱ्या डॉ. अर्चना शर्मा आत्महत्या(Dr Archana Sharma Suicide) प्रकरणानंतर आता त्यांच्या मुलीचं भावूक पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चौथीत शिकणाऱ्या श्यामभवीने तिच्या आईच्या आठवणीत एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र वाचणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. हे पत्र श्यामभवीने तिच्या वडिलांना वाचून दाखवले तेव्हा वडील डॉ. सुनीत धाय मोकलून रडू लागले. डॉ. अर्चना शर्मा यांची मुलगी मागील ३ दिवसांपासून जयपूरमध्ये आहे. त्याठिकाणाहून तिने हे पत्र आईच्या आठवणीत लिहिलं आहे.

श्यामभवीने तिच्या पत्रात म्हटलंय की, आई तू सर्वात बेस्ट आहेस. जर जगात सर्वात बेस्ट महिलांना निवडलं गेले तर तुझ्यासारखं कुणी चांगलं असू शकत नाही. कारण माझ्या आईला बेस्ट मम्मी अवॉर्ड मिळाला आहे. पण मी रडणार नाही. कारण सर्वांना वाटेल मला तुझी आठवण येतेय. जर मी रडले तर सर्व रडायला सुरुवात करतील. परंतु मी माझ्या आईला क्यूट नावही ठेवले आहे. आतापर्यंत मी तिला प्रेमाने वेगवेगळ्या नावाने हाक मारत होती असं तिने लिहिलं आहे.

श्यामभवी ही राजस्थानच्या दौसा येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर अर्चना शर्मा यांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी अर्चना यांनी जीव दिला होता. एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर दोष ठेवण्यात आला. जेलमध्ये जावं लागेल या भीतीने डॉ. अर्चनाने मानसिक तणावाखाली येत गळफास घेतला. आता त्यांची ८ वर्षाची मुलीनं आईच्या आठवणीत लिहिलेले पत्र समोर आले आहे. हे पत्र तिने तिच्या मित्रांनाही पाठवले. जेव्हा श्यामभवीने लिहिलेले पत्र तिच्या वडिलांनी पाहिले तेव्हा ते ढसाढसा रडले. हे पत्र श्यामभवीच्या मावशीने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

काय आहे प्रकरण?

दौसातील आनंद हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरोधात आक्रोश व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. डॉ. अर्चना शर्मा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात म्हटलं होतं की, मी कुठलीही चूक केली नाही. कुणालाही मारलं नाही. माझा मृत्यू कदाचित मी निर्दोष असल्याचं सिद्ध करेल. मी पती आणि मुलांवर खूप प्रेम करते. कृपया, माझ्या मृत्यूनंतर त्यांना कुणीही त्रास देऊ नका. पीपीएच कॉम्पलिकेशन होते. त्यासाठी डॉक्टरांना दोष देणे बंद करा. डॉक्टरांना त्रास देऊ नका. माझ्या मुलांना आईची कमतरता भासू देऊ नका असंही मृत्युपूर्वी डॉक्टर अर्चनानं म्हटलं होते.

Web Title: An emotional letter written by 8 year-old girl in memory of her mother Dr Archana Sharma, the father burst into tears after reading it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.