आंध्र प्रदेशातील अनकापल्लीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, ४ ठार, २० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 05:56 PM2024-08-21T17:56:35+5:302024-08-21T17:57:57+5:30

आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथील अच्युतापुरम सेझ येथील एसेन्सिया कंपनीत रिॲक्टर स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

An explosion at a chemical company in Andhra Pradesh's Ankapalli kills 4 and injures 20 | आंध्र प्रदेशातील अनकापल्लीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, ४ ठार, २० जखमी

आंध्र प्रदेशातील अनकापल्लीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, ४ ठार, २० जखमी

आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथील अच्युतापुरम सेझ येथील एसेन्सिया कंपनीत रिॲक्टर स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. जखमींना अनकापल्ली एनटीआर हॉस्पिटल आणि स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज दुपारी ही घटना घडली.सध्या पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

वॉन्टेड झाकिर नाईकला भारतात आणलं जाणार? मलेशियन पंतप्रधानांच्या एका आश्वासनानं वाढली भारताची आस

बुधवारी कारखान्याच्या रिॲक्टरमध्ये अचानक झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने अनकापल्ली एसपी दीपिका यांच्या हवाल्याने सांगितले की, अच्युतापुरम सेझमधील कंपनीत रिॲक्टर स्फोटाच्या घटनेत १५ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जुलै महिन्यात आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यात एका सिमेंट कारखान्यात स्फोट झाला होता, त्यात १६ कामगार जखमी झाले होते. जखमी कर्मचाऱ्यांमध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बॉयलरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे.

२०२३ मध्ये, आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम येथे असलेल्या फार्मा कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. राज्य सरकारने एका निवेदनात म्हटले होते की, स्फोटाच्या वेळी प्लांटमध्ये ३५ लोक होते आणि त्यापैकी बहुतेक सुरक्षितपणे वाचले. फार्मा कंपनीच्या 'सॉलव्हेंट रिकव्हरी प्लांट'मध्ये सॉल्व्हेंट भरत असताना स्फोट झाला.

Web Title: An explosion at a chemical company in Andhra Pradesh's Ankapalli kills 4 and injures 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.