जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 08:13 PM2024-05-04T20:13:34+5:302024-05-04T20:14:20+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या वाहनांवर गोळीबार केला.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला केला असून, यामध्ये लष्कराचे काही जवान जखमी झाले असल्याचे कळते. दरम्यान, स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराची घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. घटनास्थळी असलेली वाहने हवाई तळाच्या आत शाहसीतारजवळील भागात सुरक्षित करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत. अधिक माहितीची प्रतीक्षा असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
An Indian Air Force vehicle convoy was attacked by terrorists in the Poonch district of J&K. The local Rashtriya Rifles unit has started cordon and search operations in the area. The vehicles have been secured inside the air base in the General area near Shahsitar. Military… pic.twitter.com/y5uMnAUBfw
— ANI (@ANI) May 4, 2024
पुंछमध्ये दहशतवाद्यांचे पुन्हा एकदा भ्याड कृत्य समोर आले. सुरणकोट गावात दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या दोन वाहनांवर गोळीबार केला. या घटनेत हवाई दलाचे ५ जवान जखमी झाले आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
#WATCH | J&K: Visuals of tight security checking by Indian Army personnel at Sanai area near Jarran Wali Gali (JWG) Poonch, in Surankot.
— ANI (@ANI) May 4, 2024
An Indian Air Force vehicle convoy was attacked by terrorists in the Poonch district. The injured troops have been airlifted to Command… pic.twitter.com/I747iXbndd
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जखमी जवानांना पुढील उपचारासाठी उधमपूर येथील इस्पितळात हलवण्यात आले आहे. स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे.