शेतकऱ्याचा नादच खुळा, 6 लाख खर्चून नव्या घराच्या छतावर बसवला जुना ट्रॅक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 11:17 AM2022-02-05T11:17:07+5:302022-02-05T11:31:30+5:30

राजस्थानच्या के. श्रीगंगानगर येथे शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या घराच्या छतावर 33 वर्षांपूर्वीचा जुना ट्रॅक्टर ठेवला आहे

An old tractor mounted on the roof of a new house by farmer angrez singh of rajsthan | शेतकऱ्याचा नादच खुळा, 6 लाख खर्चून नव्या घराच्या छतावर बसवला जुना ट्रॅक्टर

शेतकऱ्याचा नादच खुळा, 6 लाख खर्चून नव्या घराच्या छतावर बसवला जुना ट्रॅक्टर

googlenewsNext

जयपूर - शेतकऱ्याचं आणि बैलाचं एक वेगळंच नातं असतं. शेतातील कामात शेतकऱ्याचा मित्र, भाऊ, सहकारी बनून बैल काम करतात. मात्र, यांत्रिकरणामुळे नांगरणीच्या कामाला ट्रॅक्टरला जुंपण्यात आलं. बैलाचा भार हलका झाला आण ट्रॅक्टरही शेतकऱ्यांचा मित्र बनला. त्यामुळे, शेतीच्या कामात बहुपयोगी असणाऱ्या ट्रॅक्टरशी बळीराजानं भावनिक नातं जोडलं. या भावनिक नात्याचा बंध राजस्थानमधी एका शेतकरी कुटुंबीयांनी समाजाला दाखवून दिलाय. 

राजस्थानच्या के. श्रीगंगानगर येथे शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या घराच्या छतावर 33 वर्षांपूर्वीचा जुना ट्रॅक्टर ठेवला आहे. अनूपगढ तालुक्यातील रामसिंहपूर परिसरात राहणाऱ्या अंग्रेज सिंह यांनी 6 लाख रुपये खर्चून जुन्या ट्रॅक्टरची रंगरंगोटी व इतर कामे केली. त्यानंतर, एका मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हा ट्रॅक्टर बंगल्याच्या छतावर ठेवण्यात आला. ट्रॅक्टरमध्ये लाईट्स आणि म्युझिक सिस्टीमही लावण्यात आलं आहे. अमेरिकेतून आलेल्या शेतकरीपुत्राचे हे ट्रॅक्टरप्रेम सध्या चर्चेचा विषय बनले आहे. शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आपण हे काम केल्याचं अंग्रेजसिंह यांनी म्हटलंय. 

अंग्रेज सिंह यांनी नुकतेच नवीन घर बांधले आहे. या नव्या घराच्या उभारणीत शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा वाटा आहे, तर शेतात राबलेल्या ट्रॅक्टरचाही सहभाग आहे. त्यामुळेच, अंग्रेजसिंह यांनी 6 लाख रुपये खर्चून हा ट्रॅक्टर नवीन घराच्या छतावर दिमाखात बसवला. विशेष म्हणजे रिमोटच्या सहाय्याने हा ट्रॅक्टर सुरुही करण्यात येणार आहे. म्हणजे, तो खराब होऊ नये. दरम्यान, अंग्रेज सिंह हे 1992 साली अमेरिकेत वास्तव्यास होते. लहानपणापासूनच त्यांना बुलेट आणि ट्रॅक्टरची आवड होती. आपल्या घराच्या छतावर ट्रॅक्टर असावा हे त्यांचं स्वप्न होतं, जे त्यांनी आज पूर्ण केलं. 
 

Web Title: An old tractor mounted on the roof of a new house by farmer angrez singh of rajsthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.