विश्लेषण

By Admin | Published: March 23, 2017 05:18 PM2017-03-23T17:18:03+5:302017-03-23T17:18:03+5:30

महाजन गटाने उज्ज्वला मच्िंछद्र पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी ऐनवेळी पुढे आणले. उज्ज्वला पाटील यांचे पती मच्िंछद्र पाटील हे सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात माजी मंत्री खडसेंच्या नेतृत्वात दाखल झाले होते. मुक्ताईनगरातच पाटील यांचा प्रवेश सोहळा २०१४ मध्ये झाला होता. या स्थितीत उज्ज्वला पाटील यांच्या नावाला भाजपातील एका गटाकडून फारसा विरोध झाला नाही. त्यांच्या नावावर शेवटी एकमत झाले. दुसर्‍या बाजूला खडसे समर्थक नंदकिशोर महाजन यांना उपाध्यक्षपद मिळाल्याने खडसे गटाची नाराजी काहीशी दूर करण्याचा प्रयत्नही झाला आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात नंदकिशोर महाजन व त्यांचे समर्थक, निकटवर्तीय यांची खडसे यांना बर्‍यापैकी मदत होते. पुढील काळात नंदकिशोर महाजन यांच्या तांदलवाडी गावासह निंबोल, विटवा आदी मुक्ताईनगर मतदारसंघात असलेल्या भागात खडस्

Analysis | विश्लेषण

विश्लेषण

googlenewsNext
ाजन गटाने उज्ज्वला मच्िंछद्र पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी ऐनवेळी पुढे आणले. उज्ज्वला पाटील यांचे पती मच्िंछद्र पाटील हे सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात माजी मंत्री खडसेंच्या नेतृत्वात दाखल झाले होते. मुक्ताईनगरातच पाटील यांचा प्रवेश सोहळा २०१४ मध्ये झाला होता. या स्थितीत उज्ज्वला पाटील यांच्या नावाला भाजपातील एका गटाकडून फारसा विरोध झाला नाही. त्यांच्या नावावर शेवटी एकमत झाले. दुसर्‍या बाजूला खडसे समर्थक नंदकिशोर महाजन यांना उपाध्यक्षपद मिळाल्याने खडसे गटाची नाराजी काहीशी दूर करण्याचा प्रयत्नही झाला आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात नंदकिशोर महाजन व त्यांचे समर्थक, निकटवर्तीय यांची खडसे यांना बर्‍यापैकी मदत होते. पुढील काळात नंदकिशोर महाजन यांच्या तांदलवाडी गावासह निंबोल, विटवा आदी मुक्ताईनगर मतदारसंघात असलेल्या भागात खडसे यांची पकड आणखी मजबूत होईल. तसेच सेनेचा या भागातील शिरकाव तेवढा त्रासदायक राहणार नाही, हेदेखील मुद्दे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसने सेनेसोबत सत्तास्थापनेचा प्रयत्न केला, पण राष्ट्रवादीचे तीन सदस्य नेत्यांच्या संपर्कात अखेरपर्यंत नव्हते. यातील एक सदस्य माजी आमदार अरूण पाटील यांच्या धामोडीमधील आहे. तर दुसर्‍या सदस्य माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचे समर्थक कै.संभाजी (भरत) पाटील यांच्या भाचेसून आहे. असे असताना हे सदस्य नेत्यांच्या संपर्कात कसे आले नाहीत... हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. अर्थातच राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीची हवाही जोरात वाहू लागल्याचे यानिमित्त स्पष्ट झाले आहे.

सदस्यांमुळे काँग्रेसचे अस्तित्वाचा मुद्दाही चर्चेत
काँग्रेसचे जे सदस्य निवडून आले ते त्यांच्या व्यक्तीगत संपर्काच्या बळावर... त्यांच्या विजयात नेत्यांचा वाटा नाही, असे काँग्रेसच्या एका सदस्याने जाहीरपणे सांगितले होते. अशातच नगरपालिकांमध्ये काँग्रेस नगरसेवकांची संख्या ५४ वरून १४ वर घसरली. तर जि.प.तही १० वरून चार अशी संख्या झाली. हे अपयश जिल्हा प्रभारी व जिल्हा नेतृत्वाचा असल्याची टिका आता होऊ लागली असून, काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक, ओबीसींची मोट बांधून तसे नेतृत्व देण्याची मागणीही पुढे येऊ लागली आहे.

Web Title: Analysis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.