Anand Mahindra: 'हा' फोटो पाहून आनंद महिंद्रा निराश झाले, लगेच फोन बाजुला ठेवला; फोटोत नेमकं काय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 06:15 PM2022-11-27T18:15:12+5:302022-11-27T18:15:46+5:30
दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांची पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे.
दिग्गज उद्योगपती आणि महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते अनेकदा प्रेरणादायी आणि मजेशीर पोस्ट शेअर करत असतात. त्यांचे फॉलोअर्स, महिंद्रांच्या पोस्टटी आतुरतेने वाट पाहत असतात. यातच त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.
काय म्हणाले आनंद महिंद्रा?
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक कार्टून शेअर केले आहे. या फोटोसह कॅप्शन लिहिले की, 'हे एक अतिशय निराशाजनक कार्टून आहे. याने मला माझा फोन बाजुला ठेवण्यास मजबूर केले. हे ट्विट केल्यानंतर मी माझा फोन बाजुला ठेवणार आहे आणि रविवारी माझी मान सरळ ठेवणार आहे.'
That’s a seriously depressing cartoon. But it’s made me decide to put down the phone (after tweeting this!) and ensure that my Sunday is spent with my neck straight and my head up… pic.twitter.com/seEdiAhQAC
— anand mahindra (@anandmahindra) November 27, 2022
महिंद्रांच्या पोस्टचा अर्थ काय?
आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या कॅप्शनमधून या पोस्टचा नेमका अर्थ समजत नसेल. पण, आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगणार आहोत. या फोटोमध्ये एका नर्सिंग होममध्ये तीन वृद्ध दिसत आहेत, जे आपल्या रिकाम्या हाताकडे पाहत आहेत. त्यांना असे वाटत आहे की, त्यांनी आपल्या हातात मोबाईल पकडला आहे. पण, प्रत्यक्षात त्यांच्या हातात काहीच नाही.
या कार्टूनद्वारे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय की, मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये आपण इतके व्यस्त झालो आहोत की, आपले शरीर आणि मान झुकली आहे. आपण मान वर काढण्याचाही प्रयत्न करत नाही आहोत. असेच चालू राहिल्यास आपण नर्सिंग होममध्ये जाऊ आणि या कार्टूनप्रमाणे बनू...महिंद्रा यांची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.