केरळच्या पूरग्रस्तांचा भार पाठीवर पेलणाऱ्या मच्छिमाराला महिंद्राकडून लक्झरी कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 04:59 PM2018-09-12T16:59:05+5:302018-09-12T17:01:21+5:30
केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा देश धावून गेला होता. तर, केरळवासीयही आपापल्या परीने एक एक जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते. लष्कराचे जवान, राजकीय नेते, आयएएस अधिकारी, स्थानिक नागरिकांसह प्रत्येकजण केरळसाठी
कोची - महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्र यांचा दिलदारपणा सर्वांनाच परिचीत आहे. तसेच देशातील टॉप उद्योजकांपैकी एक असतानाही त्यांचा संदेवनशील कायम आहे. आज पुन्हा एकदा त्यांच्या संवेदनशील आणि मोठ्या मनाचा साक्षात्कार देशवासियांना झाला आहे. केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या पाठिची शिडी करणाऱ्या मच्छिमार जैसलला आनंद महिंद्रा यांनी लक्झरी कार भेट दिली. विशेष म्हणजे नुकतेच या कारचे लाँचिंग करण्यात आले होते. महिंद्रा मराझो असे या नवी कारच्या मॉडलचे नाव आहे.
केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा देश धावून गेला होता. तर, केरळवासीयही आपापल्या परीने एक एक जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते. लष्कराचे जवान, राजकीय नेते, आयएएस अधिकारी, स्थानिक नागरिकांसह प्रत्येकजण केरळसाठी आपले योगदान देत होता. त्याचवेळी, एका मच्छिमाराने आपल्या पाठिची शिडी करुन केरळमधील नागरिकांना होडीत बसवले होते. मच्छिमार जैसल असे त्याचे नाव आहे. साचलेल्या पाण्यात आपले गुडघे टेकून अर्धा वाकलेला मच्छिमार जैसल त्यावेळी खूप व्हायरल झाला होता. जैसलच्या पाठीवर पाय देऊन होडीत चढतानाचा तो व्हिडिओ माध्यमांमध्येही झळकला. जैसलच्या या कामगिरीला नेटीझन्सने डोक्यावर घेतले. जैसलच्या कार्याला सॅल्यूट करुन नेटीझन्सने तो व्हिडीओ शेअर केला होता. आता, जैसलच्या या कार्याची दखल खुद्द महिंद्र कंपनीने मालक, देशातील महान उद्योजक आनंद बजाज यांनी घेतली आहे. आनंद बजाज यांनी जैसलला महिंद्राची नवी कोरी लक्झरी कार भेट दिली आहे. केरळच्या कालिकत येथे कामगारमंत्र्यांच्या हस्ते जैसलला ही कार भेट देण्यात आली.
दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूलाही आनंद बजाज यांनी महिंद्राची TUV300 ही शानदार गाडी भेट दिली होती.
Let me clarify that the credit for this very generous gesture goes entirely to our principals @EramMotors I only applauded it loudly! It was entirely their idea. https://t.co/YHWcv0SDC5
— anand mahindra (@anandmahindra) September 11, 2018