आनंद महिंद्रांनी केला FAKE News चा खुलासा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 03:57 PM2021-09-03T15:57:38+5:302021-09-03T15:58:14+5:30
Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या एका पोस्टबद्दल खुलासा केला आहे.
नवी दिल्ली: उद्योगपती आनंद महिंद्रा(Anand Mahindra) ट्विटरवर प्रचंड अॅक्टीव्ह आहेत. अनेकदा ते त्यांच्या ट्विटरवरुन मजेशीर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांचे ट्विटरवर लाखो चाहते आहेत, त्यांच्या ट्विटची वाट पाहत असतात. सध्या आनंद महिंद्रा यांनी केलेलं एक ट्विट चांगलच व्हायरल होतयं. या ट्विटमधून त्यांनी एका खोट्या बातमीचा खुलासा केला आहे.
I’m flattered that some believe my statements are quotable & I’ve always believed in the power of social media to democratise information & share knowledge. But the downside is wrongly attributed quotes! I’ll do my best to call them out whenever possible… pic.twitter.com/2D3XrD4GpH
— anand mahindra (@anandmahindra) September 2, 2021
बऱ्याचदा जगातील काही मोठ्या व्यक्तींच्या नावे अनेक गोष्टी व्हायरल होतात. यात प्रामुख्याने मोठ्या व्यक्तींनी बोलली वाक्ये, त्यांची भाषणं किंवा इतर लिखीत गोष्टी. अशाच प्रकारची घटना आनंद महिंद्रा यांच्यासोबत झाली आहे. आनंद महिंद्रा यांच्या नावाने एक विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, प्रत्यक्षात हे विधान आनंद महिंद्रा यांनी केलंच नाही. स्वतः आनंद महिंद्रा यांनी याबाबत खुलासा केला आहे.
— anand mahindra (@anandmahindra) September 2, 2021
याबाबत ट्विट करुन माहिती देताना महिंद्रा म्हणाले की, मला आनंद होतोय की, माझी वक्तव्ये लोक गांभीर्याने घेतात. मी नेहमी सोशल मीडियावर विविध गोष्टींना आणि ज्ञानाला शेअर करण्यावर विश्वास ठेवतो. पण, अनेकदा सोशल मीडियावर काही चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात.