Corona Vaccination: “हे भारताचे यशच, पण...”; लसीकरणाबाबत आनंद महिंद्रांनी सांगितली दुसरी बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 07:26 PM2021-06-29T19:26:31+5:302021-06-29T19:30:20+5:30

Corona Vaccination: आनंद महिंद्रा यांनी लसीकरण मोहिमेची दुसरी बाजू दाखवणारे ट्विट केले असून, ते आता चर्चेचा विषय ठरत आहे.

anand mahindra says despite this achievement we vaccinated only 19 percent of population versus us | Corona Vaccination: “हे भारताचे यशच, पण...”; लसीकरणाबाबत आनंद महिंद्रांनी सांगितली दुसरी बाजू

Corona Vaccination: “हे भारताचे यशच, पण...”; लसीकरणाबाबत आनंद महिंद्रांनी सांगितली दुसरी बाजू

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या लोकसंख्येच्या केवळ १९ टक्के लोकांचेच लसीकरणअमेरिकेत मात्र हे प्रमाण ५४ टक्केआनंद महिंद्रांनी दाखवली लसीकरण मोहिमेची दुसरी बाजू

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना पाहायला मिळत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. एकूण कोरोनावरील नियंत्रणासाठी एकमेव पर्याय असलेल्या लसीकरणावर जागतिक स्तरावर भर दिला जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारताने एकूण दिलेल्या डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकले आहे. मात्र, आनंद महिंद्रा यांनी याची दुसरी बाजू दाखवणारे ट्विट केले असून, ते आता चर्चेचा विषय ठरत आहे. (anand mahindra says despite this achievement we vaccinated only 19 percent of population versus us)

महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे प्रमुख असलेले आनंद महिंद्रा आपल्या ट्विट्समुळे नेहमी चर्चेत असतात. अनेकविध क्षेत्रातील घडामोडींचा आपल्या ट्विटरवरून ते समाचार घेत असतात. ते कधी कौतुक करतात, तर अधिकारवाणीने कानही टोचतात. आताही लसीकरणाच्या मुद्द्यावर आनंद महिंद्रा यांनी केलेले ट्विट चर्चिले जात आहे. 

२ फूट उंचीची मूर्ती, विसर्जनही घरच्या घरी; वाचा, गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली

लोकसंख्येच्या केवळ १९ टक्के लोकांनाच लस 

हे यशस्वी कामगिरीनंतरही आपण आपल्या लोकसंख्येच्या केवळ १९ टक्के लोकांचेच लसीकरण करू शकलेलो आहोत. अमेरिकेत मात्र हे प्रमाण ५४ टक्के आहे. जगासोबत स्पर्धेत राहण्यासाठी, जगासोबत धावण्यासाठी आपली लोकसंख्या आपल्याला वेगाने धावण्यासाठी कायम प्रवृत्त करते. कदाचित यामुळेच आपण जगातील सर्वांत इनोव्हेटिव्ह देश होण्याचे मानकरी ठरू, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. 

दरम्यान, २१ जून २०२१ पासून लसीकरण मोहीम पुन्हा एकदा केंद्राने आपल्या हातात घेऊन १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली केली. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढल्याचे सांगितले जात आहे. लसींचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यानंतर पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांना लस देण्यात आली. तर, २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून, ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले होते.
 

Web Title: anand mahindra says despite this achievement we vaccinated only 19 percent of population versus us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.