आनंद महिंद्रांनी शेअर केला वाघ आणि बदकाचा व्हिडिओ; तरुणांना सांगितली 'खास' बिझनेस ट्रिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:46 PM2021-07-01T20:46:42+5:302021-07-01T20:48:27+5:30

एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे आणि तरुणांना खास बिझनेस ट्रिकही समजावून सांगितली आहे. हा व्हिडीओ आहे बदक आणि वाघाचा. यात बदकाने वाघाला अक्षरशः घाम फोडला आहे.

Anand Mahindra share tiger catch the duck video on twitter and tells the important business tricks to the youngers | आनंद महिंद्रांनी शेअर केला वाघ आणि बदकाचा व्हिडिओ; तरुणांना सांगितली 'खास' बिझनेस ट्रिक!

आनंद महिंद्रांनी शेअर केला वाघ आणि बदकाचा व्हिडिओ; तरुणांना सांगितली 'खास' बिझनेस ट्रिक!

Next

 
नवी दिल्ला - सोशल मिडियावर (Social Media) सातत्याने गमतीशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, या व्हिडिओंमागील अर्थ अथवा तर्क फारच कमी लोक सांगू शकतात. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे आणि तरुणांना खास बिझनेस ट्रिकही समजावून सांगितली आहे. हा व्हिडीओ आहे बदक आणि वाघाचा. यात बदकाने वाघाला अक्षरशः घाम फोडला आहे. (Anand Mahindra share tiger catch the duck video on twitter and tells the important business tricks to the youngers)

आनंद महिंद्रा हे सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांनी नुकताच एक मजेशीर व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका डबक्यात एक वाघ बदकाची शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे, या डबक्यातील बदकाने त्या शिकार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या वाघाला पार घाम फोडल्याचेही दिसत आहे. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ लोक मनोरंजन म्हणून पाहत असले, तरी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या व्हिडिओच्या माध्यमाने तरुणांना अथवा लोकांना खास बिझनेस ट्रिक सामजावून सांगितली आहे.

अनेक राज्यांकडून निर्बंधात सूट देण्यास सुरूवात; आनंद महिंद्रांनी शेअर केलं मजेदार ट्वीट

या व्हिडीओमध्ये, एका डबक्यात वाघ आणि बदक दिसत आहेत. वाघ त्या बदकाची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो त्या बदकाजवळ जाताच बदक पाण्यात जातो आणि दुसरीकडून बाहेर येतो. बदल अॅक्टिव्ह असल्यामुळे तो काही वाघाच्या हाती लागत नाही.

बाईकवर सोशल डिस्टेंसिंग ठेवण्यासाठी पठ्ठ्यानं केला भन्नाट जुगाड; आनंद महिंद्रा म्हणाले की.....

या व्हिडिओला कॅप्शन देताना आनंद महिंद्रांनी लिहिले आहे, की कोणत्याही मॅनेजमेंट व्याख्यानापेक्षा छोटे, पण सक्रिय असल्याचे व्यवसायात फायदे. यामुळेच मोठ्या कंपन्यांना नवीन संधीसाठी आपल्या कंपनीत नव्या स्टार्टअप टीम आणि स्टार्टअप कल्चर राबविण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखहून अधिक वेळा बघितला गेला आहे.

Web Title: Anand Mahindra share tiger catch the duck video on twitter and tells the important business tricks to the youngers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.