अनंतकुमार हेगडेंच्या माफीमुळे वाद निवळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 04:17 AM2017-12-29T04:17:25+5:302017-12-29T04:17:32+5:30
नवी दिल्ली : घटना बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी लोकसभेत गुरुवारी माफी मागितल्यानंतर निवळला. आपल्या वक्तव्याला चुकीचे स्वरूप दिले गेल्याचा दावाही त्यांनी केला.

‘‘माझे शब्द विचित्र वळण देऊन सादर केले गेले. मी तसे काही बोललोच नव्हतो. तरीही जर कोणी दुखावले गेले असेल तर मी त्या सदस्यांची क्षमा मागतो’’, असे हेगडे म्हणाले. प्रश्नोत्तराचा तास संपताना अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हेगडे यांना तुमच्या विधानांमुळे जर कोणी दुखावले गेले असेल तर त्यांची माफी मागा, असे आवाहन केले होते. जीवनात असे होते की जे आम्ही म्हणालो ते बरोबर होते, असे वाटते परंतु त्यामुळे इतर अजूनही दुखावले जाऊ शकतात, असे महाजन म्हणाल्या.
तत्पूर्वी, हेगडे म्हणाले की, घटना माझ्यासाठी सर्वोच्च असून एक नागरिक या नात्याने मी कधीही त्याविरोधात जाऊ शकत नाही. घटना, संसद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला परम आदर आहे. हेगडे यांच्या खुलाशाला काँग्रेसचे सभागृहातील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेप घेतल्यावर हेगडे म्हणाले होते की, माझ्या वक्तव्यांनी जर कोणी दुखावले गेले असेल तर मी माफी मागायला तयार आहे.