'वारंवार विनंती...! ...म्हणून अनंत-राधिकाच्या लग्न समारंभात सहभागी होणार ममता बॅनर्जी; या बड्या नेत्यांनाही भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 02:50 PM2024-07-12T14:50:35+5:302024-07-12T14:52:21+5:30
Anant-Radhika Wedding : ग्नल समारंभांत जाणे ममता बॅनर्जी याना फारसे आवडत नाही. मात्र त्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नासाठी जात आहेत. यामुळे अणेकांना आश्चर्य वाटत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट आज लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नासाठी देशातील अणेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. देशातील काही बडे राजकीय नेतेही या लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जीही या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी मुंबईत येत आहेत.
ग्नल समारंभांत जाणे ममता बॅनर्जी याना फारसे आवडत नाही. मात्र त्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नासाठी जात आहेत. यामुळे अणेकांना आश्चर्य वाटत आहे. यासंदर्भात बोलताना स्वतः ममता म्हणाल्या, 'नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी वारंवार विनंती केल्याने आपण या लग्नासाठी जात आहोत.'
'वारंवार विनंती केली' -
कोलकात्याच्या नेताजी सुभाष चंद्र बोस इंटरनॅशनल विमानतळावरून मुंबईकडे निघताना माध्यमांसोबत बोलताना ममता म्हणाल्या, "खरे तर लग्नात सहभागी होण्याचा आपला कसलाही प्लॅन नव्हता. मात्र, अंबानी फॅमिलीने वारंवार विनती करेल्याने आपण या लग्न समारभासाठी जात आहोत. मुकेशजी आणि नीताजी यांनी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी वारंवार विनती केली. म्हणून मी मुंबईला जात आहे."
शरद पवार-उद्धव ठाकरेंनाही भेटणार -
मुंबईत पोहोचल्यानंतर ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. यासंदर्भात खुद्द ममता बॅनर्जी यांनीच खुलासा केला आहे. 'आपण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन राजकीय विषयावर चर्चा करणार आहोत,' असे त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी 13 जुलैला बंगालमध्ये परतू शकतात.
हे राजकीय नेतेही हो शकतात सहभागी -
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्न समारंभासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी राष्ट्रपति रामनाथ कोविंद, केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, आंद्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही सहभागी होऊ शकतात.