"हिंदूंच्या मुलींना स्पर्श करणारे हात उखडून फेका"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 10:13 AM2019-01-28T10:13:53+5:302019-01-28T10:48:35+5:30
वादग्रस्त विधानासाठी चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.
कोडागू- वादग्रस्त विधानासाठी चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. जर कोणी हिंदू मुलीला स्पर्श केला, तर त्याचे हात मुळापासून उखडून फेका, असं विधान केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलं. कर्नाटकातल्या कोडागूमध्ये एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं.
केंद्रीय मंत्री रॅलीला संबोधित करताना म्हणाले, जो हिंदूंच्या मुलींना स्पर्श करेल, त्याचे हात तोडून टाका, इतिहास अशाच प्रकारे लिहिला जातो आणि जेव्हा तुम्ही इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात एक प्रकारची हिंमत येते. तुम्ही इतिहास वाचल्यास भीती निर्माण होते. आता आपणच ठरवावं तुम्हाला इतिहास लिहायचा की वाचायचाय ?, जातीसंदर्भात विचार न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे, असंही अनंत कुमार हेगडे म्हणाले आहेत. तसेच ताजमहाल हे मुस्लिमांनी तयार केलेलं नाही. शाहजहाँनं ताजमहाल हा राजा जय सिंह यांच्याकडून विकत घेतला होता. ताजमहाल एक शिव मंदिर आहे, ज्याचं निर्माण राजा परमतीर्थ यांनी केलं होतं.
ताजमहालचं पहिलं नाव तेजो महालय होतं. त्याचं नंतर ताजमहाल असं नामकरण करण्यात आलं. टीपू जयंतीवरही हेगडे यांनी टीका केली आहे. ब्रिटिशांच्या काळात चार युद्ध लढणार टीपू सुलतान हा बलात्कारी होता. टीपू जयंतीच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं हेगडेंनी स्पष्ट केलं आहे. जे लोक स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि बुद्धिजीवी समजतात, त्यांची स्वतःची अशी कोणतीही ओळख नसते.