अनंतनाग पोटनिवडणूक रद्द करा - गिलानी
By admin | Published: April 20, 2017 10:13 PM2017-04-20T22:13:32+5:302017-04-20T22:13:32+5:30
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी होणारी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी हुरियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनेचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 20 - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी होणारी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी हुरियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनेचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी केली आहे.
अधिका-यांनी आपला अहंकार बाजूला ठेवून दक्षिण काश्मीरमध्ये होणारी पोटनिवडून रद्द केली पाहिजे. यामुळे घाटीमध्ये घडणा-या दगडफेकी सारख्या हिंसक घटना कमी होतील, अशी शक्यता सय्यद अली शाह गिलानी यांनी वर्तविली आहे.
काश्मीर खोऱ्यातील स्थिती तणावपूर्ण असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिली. ही पोटनिवडणूक उधळून लावण्यासाठी हिंसक कारवाया होण्याची शक्यताही राज्य सरकारने वर्तविली होती. यानंतर अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिलला होणारी पोटनिवडणूक आयोगाने 25 मे रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीनगर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. या मतदानावेळी शहरात काही नागरिकांकडून अभूतपूर्व हिंसाचार घडविण्यात आला. मतदान केंद्रेच ताब्यात घेऊन लोकशाही प्रक्रियेत अडथळे आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या हिंसक नागरिकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते.