‘मतदानावर बंदी घातली तर अराजकता माजेल’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 07:25 AM2024-10-16T07:25:22+5:302024-10-16T07:27:49+5:30
मतदानाला आजच सुरुवात झाली आहे. या टप्प्यात निवडणुकीवर कशी स्थगिती आणणार?
नवी दिल्ली : पंजाबमध्ये होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट शब्दात नकार दिला.
राज्याच्या ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप या याचिकांमध्ये केला होता. मात्र, मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती केल्यास राज्यात अराजकता माजेल अशी भीती व्यक्त करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिला.
मतदानाला आजच सुरुवात झाली आहे. या टप्प्यात निवडणुकीवर कशी स्थगिती आणणार? असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला. ऐन मतदानाच्या दिवशीच मतदानावर बंदी घातली तर अराजकता माजेल, असे निरीक्षण सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नोंदविले. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारी ६ वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले होते.