.. आणि रागावलेल्या त्या तरूणीने काढून फेकला कुर्ता
By Admin | Published: November 15, 2016 04:07 PM2016-11-15T16:07:09+5:302016-11-15T16:07:09+5:30
रोख पैशांसाठी एटीएमच्या रांगेत उभी राहून वैतागलेल्या तरूणीने भर बाजारात अंगावरचा कुर्ताच काढून फेकला.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - रोख रकमेच्या तुटवड्यामुळे एटीएमच्या रांगेत उभं राहून वैतागलेल्या तरूणीने निषेधार्थ अंगावरचा कुर्ताच काढून फेकल्याची घटना राजधानी दिल्लीतील मयूर विहारमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरूणी पैसे काढण्यासाठी दिल्लीतील मयूर विहार फेज -३ येथील एका एटीएमच्या रांगेत उभी होती. मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही रांग पुढे न सरकल्याने ती तरूणी वैतागली आणि तिने भर बाजारात अचानक कुर्ता काढून टाकला. या घटनेमुळे आजूबाजूचे लोक अवाक झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झाले व एका महिला पोलिस कर्मचा-याने तिच्या अंगावर पुन्हा कुर्ता चढवला. त्यानंतर त्यांनी तिला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन समज देण्यात आली. पोलिसांनी नंतर तिला पुन्हा एटीएममध्ये घेऊन गेले व पैसे काढून दिले.