...आणि मोदींनी कर्मचा-याला आपले शूज काढण्यापासून रोखलं
By admin | Published: May 4, 2017 08:22 AM2017-05-04T08:22:52+5:302017-05-04T09:23:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौ-यासाठी गेले असता तेथील उपस्थित कर्मचारी त्यांच्या पायातील शूज काढण्यासाठी पुढे सरसावला
Next
ऑनलाइन लोकमत
उत्तरांचल, दि. 4 - एखाद्या जाहीर किंवा खासगी कार्यक्रमात कार्यकर्त्याने नेत्याची चप्पल, शूज काढल्याचे किंवा उचलून घेतल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. त्यांचा अशा वागण्याला लोकांनी विरोध केला तरी त्यांना फरक पडताना दिसत नाही. सोशल मीडियावर अनेकदा असे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी अपवाद ठरले असून पुन्हा एकदा सर्वांसमोर उदाहरण ठेवलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौ-यासाठी गेले असता तेथील उपस्थित कर्मचारी त्यांच्या पायातील शूज काढण्यासाठी पुढे सरसावला. मात्र यावेळी मोदींनी इतर नेत्यांप्रमाणे पाय पुढे करत शूज काढून न घेता त्याला थांबवलं आणि स्वत:च शूज काढला. मोदींच्या या वागण्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे मोदींच्या उत्तराखंड दौ-यातील या घटनेची सर्वात जास्त चर्चा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळीस ही घटना घडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी उत्तराखंड दौ-यावर होते. यावेळी त्यांनी केदारनाथचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे मोदी देशातील पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांच्या दर्शनानंतर केदारनाथचं दर्शन सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं झालं. केदारनाथाचं दर्शन घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले भाविक ठरले. मोदींनी केदारनाथच्या मंदिरात पोहोचून रुद्राभिषेक केला. महाप्रलयाच्या 3 वर्षानंतर पहिल्यांदाच केदारनाथमध्ये इतका जंगी सोहळा झाला.
पंतप्रधान झाल्यापासून मोदींचा केदारधमाचा हा पहिलाच दौरा आहे. याआधी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केदारधामला भेट दिली होती.