...अन् मोहन भागवत त्या महिलेला म्हणाले, 'मी नेता नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 12:08 PM2018-03-22T12:08:20+5:302018-03-22T12:10:24+5:30
त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
भोपाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मध्य प्रदेशच्या दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान काल ते भोपाळमध्ये असताना त्यांना भेटण्यासाठी एक महिला सुरक्षा घेरा तोडून निवेदन देण्यासाठी आली होती. त्यावेळी भागवत तिला म्हणाले की माझ्याकडे निवेदन द्यायला 'मी नेता नाही'. सुत्रांच्या वृत्तानुसार, त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. मोहन भागवत या झेड प्लस सुरक्षा आहे.
भोपाळ येथील टीकमगढमधील एका सभेदरम्यान मोहन भागवत यांना भेटण्यासाठी सुरक्षा भेदून ती पोहचली होती. यावेळी त्या महिलेला मोहन भागवत यांना एक निवेदन द्यायचे होते. सरकारी नोकरीसाठी मध्येप्रदेशमध्ये सध्या आंदोलन सरु आहे. या आंदोलनकर्त्यांमध्ये या महिलेचा समावेश आहे. ती महिला मोहन भागवत यांच्याजवळ पोहचली तेव्हा सुरक्षा रक्षकांनी तिला अडवले. यावेळी मोहन भागवत यांचे लक्ष त्या महिलेकडे गेेले. महिलेने तात्काळ निवेदन देण्याचा प्रयत्न केला. पण महिला देत असलेलं निवेदन मोहन भगवत यांनी घेणं टाळलं. ते त्या महिलेला म्हणाले की, मला निवेदन द्यायला मी काही नेता नाही.
या दौ-यादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आणला आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील मऊसहानिया येथे महाराज छत्रसाल यांची 52 फूट उंच प्रतिमेच्या अनावरण सोहळ्यात ते सहभागी झाले होते. या सोहळ्यात संबोधित करत असताना मोहन भागवत म्हणाले की, राम मंदिर बांधणे आमची केवळ इच्छा नाही तर हा आमचा संकल्प आहे आणि हा संकल्प आम्ही पूर्णत्वास नेणार. शिवाय राम मंदिर बांधण्याची आताची वेळ अनुकूल असल्याचंही त्यांनी म्हटले. यामुळे जे राम मंदिर बांधणार आहेत त्यांनी रामाप्रमाणे होण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच हे कार्य शक्य आहे, असंही ते म्हणालेत अशा पद्धतीनं मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आणत नवीन प्रश्न निर्माण केले आहेत.