..आणि प्रचार टेक्नोसॅव्ही झाला !

By admin | Published: September 28, 2014 01:34 AM2014-09-28T01:34:20+5:302014-09-28T01:34:20+5:30

विधानसभा असो वा नगरसेवक पदाची निवडणूक असो, 60, 70 आणि 8क् आणि अगदी 9क् च्या दशकातील निवडणुका सभांनी गाजल्या होत्या.

..and propaganda Technosavi! | ..आणि प्रचार टेक्नोसॅव्ही झाला !

..आणि प्रचार टेक्नोसॅव्ही झाला !

Next
>ताई माई आक्का, विचार करा पक्का.. अशा घोषणा नेटवर्किगमुळे दूरवर फेकल्या गेल्या
कसभा असो, विधानसभा असो वा नगरसेवक पदाची निवडणूक असो, 6क्, 7क् आणि 8क् आणि अगदी 9क् च्या दशकातील निवडणुका सभांनी गाजल्या होत्या. कारण त्या वेळी त्या त्या राजकीय पक्षांचे नेते आणि त्यांच्या भाषण शैलीला एक धार होती. आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांची भाषणो म्हणजे तरुणांना एक प्रकारची पर्वणीच असे. अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर 1968 साली मुंबईत घोषणांद्वारे रंगविण्यात आलेल्या प्रभावी भिंतींनी शिवसेनेला ती निवडणूक जिंकून देण्यात वाटा 
उचलला होता. या काळातील निवडणुकांमध्ये जणू काही भिंतीच बोलत असत. भिंतींवर रंगविण्यात आलेल्या घोषणा मतदारांचे लक्ष वेधून घेत असत, त्यांना साद घालत. त्या काळात राजकीय पक्षांसमोर भिंतीशिवाय समर्पक असा दुसरा काही पर्यायही नव्हता.
मुंबईत एक काळ असा होता, की त्या वेळी मुंबईतल्या भिंतींवर कामगारांची मक्तेदारी होती. त्यानंतर शिवसेनेने दिलेल्या घोषणांनी तर मुंबई अक्षरश: दणाणून गेली. भिंतीशिवाय मुंबईतील पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या आणि पूल यांचाही घोषणांनी ताबा घेतला होता. मुंबईकरांना शिवसेनेच्या घोषणा अधिक जवळच्या वाटायच्या आणि आजही वाटतात. मुळात शिवसेनेच्या घोषणा लोकांना भावनिक आवाहन करीत असल्याने लोकांना त्या अक्षरश: जिंकायच्या. शिवसेनेची ‘शिवरायांची शपथ तुम्हाला, विजयी करा शिवसेनेला’ या घोषणोने तर मराठी मातीला अक्षरश: जिंकले होते.
दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘सायकल पंक्चर..’ या वाक्यावर तर लोक अक्षरश: ‘झालीच पाहिजे..’ असे म्हणत प्रतिसाद द्यायचे. 
 
मुंबईत पार पडलेल्या निवडणुकांमध्ये एक काळ असा होता की मुंबईतल्या भिंतीवर म्हणी, वाक्प्रचार, सुविचार आणि काव्यपंक्ती रंगत. आज अशा घोषणा नाहीत आणि भिंतीही रंगत नाहीत. या भिंतींची जागा आता फेसबुकच्या भिंतींनी घेतली आहे. तरीही ‘आवाज कुणा’चा असे म्हटले की लोकांच्या तोंडातून आपसूकच ‘शिवसेनेचा’ हे येते; हेही तितकेच खरे आहे.
फरक एवढाच की, आता मैदानी सभा पूर्वीसारख्या गाजत नाहीत. ती रणधुमाळी माजत नाही आणि हे होत असले तरी तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना सोशल नेटवर्क साइट्सचा आधार घ्यावा लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता सारे काही सोशल नेटवर्क साइट्सवर होते. ‘मराठी युवकांचा दावा आहे, राज ठाकरे छावा आहे’; ‘घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, राजसाहेबांशिवाय वाली नाही मराठी मातीला’; ‘आमचे मत कोणाला, मराठीच्या अस्मितेला’; ‘आम्ही मतदार कोणाचे, राज ठाकरेच्या मनसेचे’; ‘जनता आता पेटली आहे, युत्या आघाडय़ांना विटली आहे’ अशा घोषणा आता सोशल नेटवर्किग साइट्सवर वाचायला आणि पाहायला मिळतात.
तळहातावर मावणा:या 
मोबाइलने क्रांती केली आहे आणि हाच मोबाइल आता हायटेक प्रचाराचे हायटेक माध्यम झाल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिसून आले आहे आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान दिसत आहे. त्यामुळे पूर्वी मैदानी सभा गाजवणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा 
आणि मनसे यांचा अधिकाधिक प्रचार 
आणि प्रसार सोशल नेटवर्किग साइट्सवर 
रंगत आहे आणि तरुण मतदाराला अधिकाधिक आकर्षित करण्याचा 
प्रयत्न करीत आहे.
 
स्वतंत्र भारतानंतर अगदी ऐंशीच्या दशकार्पयत झालेल्या निवडणुकांमध्ये झालेला प्रचार आणि प्रसार हा पत्रके आणि सभांद्वारे होत होता. शिवाय घोषणा आणि त्याद्वारे रंगविण्यात आलेल्या भिंती हाही एक वेगळा भाग होता. मात्र तंत्रज्ञानाने क्रांती केली आणि राजकीय निवडणुकांचा प्रचार आणि प्रसारदेखील टेक्नोसॅव्ही झाला. आता तर एकविसाव्या शतकात सोशल नेटवर्किग साइट्सच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसारावर जोर दिला जात असून,  ‘ताई माई आक्का, विचार करा पक्का..’ अशा घोषणा कुठे तरी दूरवर फेकल्या गेल्या.
 
सचिन लुंगसे
 

Web Title: ..and propaganda Technosavi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.