...तर पाकला सडेतोड उत्तर - राजनाथसिंह
By admin | Published: July 28, 2015 03:40 AM2015-07-28T03:40:10+5:302015-07-28T03:40:10+5:30
भारताला पाकिस्तानसोबत सौहार्दाचे संबंध ठेवायचे आहेत, मात्र देशाभिमानाला आव्हान दिले जात असेल तर सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह
नीमूच (मध्य प्रदेश) : भारताला पाकिस्तानसोबत सौहार्दाचे संबंध ठेवायचे आहेत, मात्र देशाभिमानाला आव्हान दिले जात असेल तर सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मध्य प्रदेशच्या नीमूच येथे बोलताना दिला. गुरदासपूरच्या दहशतवादी हल्ल्याबाबत मंगळवारी संसदेत निवेदन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवायचे असताना सीमेपलीकडून दहशतवादी घटना कायम का ठेवल्या जात आहे, हे कळायला मार्ग नाही. आम्हाला शांतता हवी आहे, तथापि देशाभिमानाची किंमत चुकवून नाही, हे मी पाकिस्तानला सांगू इच्छितो. आम्ही पाकिस्तानवर पहिल्यांदा हल्ला करणार नाही, पण आम्हाला आव्हान दिले जात असेल तर सडेतोड उत्तर दिले जाईल, हे मी यापूर्वीही म्हटले असून पुन्हा एकदा सांगतो आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ७६ व्या स्थापनादिनानिमित्त मानवंदना स्वीकारण्यासाठी ते येथे आले होते.