... अन् आई बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं; ५८ वर्षीय महिलेनं जुळ्या मुलांना दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 06:57 PM2023-06-26T18:57:51+5:302023-06-26T19:00:56+5:30

महिलेनं आयवीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यामध्ये, एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन गोंडस मुले जन्माला आली आहेत.

... And the dream of becoming a mother came true; A 58-year-old woman gave birth to twins by IVF | ... अन् आई बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं; ५८ वर्षीय महिलेनं जुळ्या मुलांना दिला जन्म

... अन् आई बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं; ५८ वर्षीय महिलेनं जुळ्या मुलांना दिला जन्म

googlenewsNext

बिकानेर - भगवान के घर दे है, लेकीन अंधेर नही... ही म्हण आपण ऐकली किंवा वाचली असेल. पण, ही म्हण एका महिलेच्या आयुष्यातील अंधार दूर करुन गेली. खरंच, उशिरा का होईना, पण तिची आर्त हाक देवाने ऐकली आणि आई बनण्याचं सौभाग्य तिला प्राप्त झालं. ५८ वर्षीय महिला शेरा भादूने आई बनण्याची आशा सोडूनच दिली होती. मात्र, आयवीएफ तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळताच, या महिलेनं त्याचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला वय जास्त असल्याने महिलेला संकोच वाटत होता. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी विश्वास दिल्यानंतर महिलेनं बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. 

महिलेनं आयवीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यामध्ये, एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन गोंडस मुले जन्माला आली आहेत. बिकानेरच्या डॉ. शैफाली दाधीच तुंगारिया यांनी शनिवारी यशस्वी प्रयत्न करुन दाखवला. डॉ. शैफाली यांनी शेरा यांनी सांगितले की, वयाच्या ५० वर्षानंतरही आई बनण्याची इच्छा समाप्त होऊ शकत नाही. विशेषत: आयवीएफबद्दल समाजात कमी जागरूकता असून ४५ ते ५० वर्षांच्या महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. मात्र, महिला ५५ वर्षांपेक्षा कमी असल्याची केस पहिल्यांदाच आल्याचं डॉ. शैफाली यांनी म्हटलं आहे. 

संबंधित महिलेची शारिरीक तपासणी केल्यानंतर सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे, हार्मोन्सला ठीक केल्यानंतर १ वर्ष देखभालीत ठेवण्यात आलं. त्यात, यश मिळालं आणि शनिवारी बिकानेर येथील शेरा भादूने जुळ्या मुलांना जन्म दिला. विशेष म्हणजे दोन्ही मुलांची आणि मातेची प्रकृती ठणठणीत आहे. आयवीएफ म्हणजे व्यंधत्व होय. आईवीएफ (IVF) चा इन विट्रो फर्टिलाइजेशन असा आहे. प्रयोगशाळेच्या माध्यमातून अंडाकोष फर्टीलाईज केलं जातं 

Web Title: ... And the dream of becoming a mother came true; A 58-year-old woman gave birth to twins by IVF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.