अन् फसवणुकीचा प्रकार उघड झाला
By Admin | Published: October 21, 2016 12:18 AM2016-10-21T00:18:22+5:302016-10-21T00:18:22+5:30
वारंवार नुसते पत्र दिले जात आहे, मात्र नियुक्ती होत नसल्याने रितेश याने दोघांना जाब विचारला असता ७/८ दिवसाचे कारण सांगून ते टाळाटाळ करत होते. दोघांबाबत शंका आल्याने रितेश याने चौकशी केली असता रायपुरमधीलच अनेकांची त्यांनी फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यात योगेश ईश्वर परदेशी, पवन ईश्वर परदेशी, धीरज अर्जुन ठाकूर, अमोल अशोक परदेशी (रा.रायपूर), योगेश फकीरा परदेशी, जगदीश मोतीराम करघे (रा.हळदा,ता.सिल्लोड), भगवान धनराज परदेशी (शिंदाड, ता.पाचोरा),श्रीकांत अशोक परदेशी व अमोल शालीक परदेशी (रा.चोपडा) यांचा समावेश आहे. दरम्यान, रितेश याने या सर्वांना घेऊन रेमंड कंपनीत जाऊन चौकशी केली असता गुप्ता नावाचा कोणीच मॅनेजर नाही व हे पत्रही बनावट असल्याचे सांगितले. या सर्वांकडून रोख व बॅँक खात्यावर त्यांनी पैसे मागविले होते.
व रंवार नुसते पत्र दिले जात आहे, मात्र नियुक्ती होत नसल्याने रितेश याने दोघांना जाब विचारला असता ७/८ दिवसाचे कारण सांगून ते टाळाटाळ करत होते. दोघांबाबत शंका आल्याने रितेश याने चौकशी केली असता रायपुरमधीलच अनेकांची त्यांनी फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यात योगेश ईश्वर परदेशी, पवन ईश्वर परदेशी, धीरज अर्जुन ठाकूर, अमोल अशोक परदेशी (रा.रायपूर), योगेश फकीरा परदेशी, जगदीश मोतीराम करघे (रा.हळदा,ता.सिल्लोड), भगवान धनराज परदेशी (शिंदाड, ता.पाचोरा),श्रीकांत अशोक परदेशी व अमोल शालीक परदेशी (रा.चोपडा) यांचा समावेश आहे. दरम्यान, रितेश याने या सर्वांना घेऊन रेमंड कंपनीत जाऊन चौकशी केली असता गुप्ता नावाचा कोणीच मॅनेजर नाही व हे पत्रही बनावट असल्याचे सांगितले. या सर्वांकडून रोख व बॅँक खात्यावर त्यांनी पैसे मागविले होते.पोलीस ठाण्यात धावफसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर रितेश व त्याच्या मित्रांनी पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांची भेट घेवून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी व सहकार्यांनी गणेश विसपुते याला नेरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.