अन् तासाभरातच बँक कारकून चक्क करोडपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 07:49 AM2023-07-17T07:49:45+5:302023-07-17T07:50:28+5:30

बँक व्यवस्थापक बलजिंदर सिंह मिठाई घेऊनच त्यांच्या घरी आले. तेव्हा रुपिंदरजित सिंह यांचा त्यावर विश्वास बसला.

And within an hour the bank clerk is a millionaire! | अन् तासाभरातच बँक कारकून चक्क करोडपती!

अन् तासाभरातच बँक कारकून चक्क करोडपती!

googlenewsNext

बलवंत तक्षक

चंडीगड : लॉटरीचे तिकीट खरेदी केल्यावर अवघ्या एका तासात कुणी करोडपती झाल्याचे ऐकले आहे का? पंजाबमध्ये रुपिंदरजित सिंह यांच्याबाबतीत हा सुखद प्रकार घडला.  

रुपिंदरजित सिंह हे पंजाबच्या गुरदासपूर भागातील डेरा बाबा नानकमध्ये कृषी विकास बँकेत कारकून आहेत. ते बटालाचे रहिवासी आहेत. त्यांनी नागालँड लॉटरीशी संबंधित प्रत्येकी सहा रुपयांची २५ तिकिटे खरेदी केली होती. शुक्रवारी रात्री त्यांना एक कोटी रुपये जिंकल्याचा संदेश आला, पण त्यांचा यावर विश्वास बसला नाही. ही बातमी समजल्यानंतर बँक व्यवस्थापक बलजिंदर सिंह मिठाई घेऊनच त्यांच्या घरी आले. तेव्हा रुपिंदरजित सिंह यांचा त्यावर विश्वास बसला.

Web Title: And within an hour the bank clerk is a millionaire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.