अन् महिला कार्यकर्त्यांनी केले पलायन भाजपा महिला आघाडी : पोलिसांनी हटकले, कार्यकर्त्यांनी घातला वाद

By admin | Published: December 10, 2015 11:57 PM2015-12-10T23:57:47+5:302015-12-10T23:57:47+5:30

जळगाव : पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये सुरू असलेल्या आरोेप प्रत्यारोपांच्या वादात शक्रवारी भाजपा महिला आघाडी उतरली. मात्र पोलिसांनी हटकताच आंदोलनकर्त्या महिलांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला. याप्रकारानंतर मात्र भाजपाचे काही पदाधिकारी व पोलीस अधिकार्‍यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

And women workers flee from BJP BJP women's wing: Police threw out, workers protested | अन् महिला कार्यकर्त्यांनी केले पलायन भाजपा महिला आघाडी : पोलिसांनी हटकले, कार्यकर्त्यांनी घातला वाद

अन् महिला कार्यकर्त्यांनी केले पलायन भाजपा महिला आघाडी : पोलिसांनी हटकले, कार्यकर्त्यांनी घातला वाद

Next
गाव : पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये सुरू असलेल्या आरोेप प्रत्यारोपांच्या वादात शक्रवारी भाजपा महिला आघाडी उतरली. मात्र पोलिसांनी हटकताच आंदोलनकर्त्या महिलांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला. याप्रकारानंतर मात्र भाजपाचे काही पदाधिकारी व पोलीस अधिकार्‍यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी पालकंमत्री एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध शिवसेनेच्या बैठकांमधून अनेक आरोप केले. त्याला उत्तर म्हणून भाजपाच्या पदाधिकार्‍यांनीही गुलाबरा पाटील यांच्या विरुद्ध आंदोलने व आरोपांचे सत्र सुरू केले आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या या वादात गुरुवारी भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उतरल्या. टॉवर चौकात सायंकाळी ५.३० वाजता या महिलांनी येऊन गुलाबराव पाटील यांच्या विरोधात फलक झळकावत घोषणा दिल्या. या आंदोलनात महिला आघाडीच्या पदाधिकारी वासंती चौधरी, उज्ज्वला बंेंडाळे, सीमा माळे, दीपमाला काळे, जयश्री पाटील, सरिता नेरकर, रेखा वर्मा, ज्योती राजपूत, शरिफा तडवी यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. महिलांची घोषणाबाजी सुरू होताच. जवळच असलेल्या शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी टॉवर चौकात आले.
महिलांना केली विचारणा
आंदोलन स्थळी आलेल्या पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या परवानगीची विचारणा करून पोलीस स्टेशनला येण्याच्या सूचना केल्या. पोलीस स्टेशनला बोलावले जाताच या महिलांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला. या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी अशोक लाडवंजारी, नगरसेवक सुनील माळी व अन्य कार्यकर्ते दाखल झाले. त्यांच्यात व पोलीस कर्मचार्‍यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. रस्त्यावर वाद नको म्हणून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला येण्याच्या सूचना दिल्या. पोलीस स्टेशनला आलेल्या या कार्यकर्त्यांशी चर्चा करून नंतर त्यांना जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या.

Web Title: And women workers flee from BJP BJP women's wing: Police threw out, workers protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.