...तर 28 फेब्रुवारीनंतर तुमचं बॅंक अकाउंट होईल बंद

By admin | Published: February 16, 2017 06:54 AM2017-02-16T06:54:42+5:302017-02-16T23:14:04+5:30

आयकर विभागाचे निर्देश, बॅंक अकाउंट गोठवण्याचा इशारा

... and your bank account will be closed after 28 February | ...तर 28 फेब्रुवारीनंतर तुमचं बॅंक अकाउंट होईल बंद

...तर 28 फेब्रुवारीनंतर तुमचं बॅंक अकाउंट होईल बंद

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16- बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड जोडणी नसेल केली तर 28 फेब्रुवारीपर्यंत करून घ्या अन्यथा तुमचं बॅंक अकाउंट बंद केलं जाण्याची शक्यता आहे. आयकर विभागाकडून 28 फेब्रुवारीपर्यंत बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांचे बॅंक अकाउंट  28 फेब्रुवारीपर्यंत पॅनकार्डसह जोडलेले नसतील ते गोठवले जाऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे.  
 
आयकर विभागाच्या निर्देशानंतर सर्व बॅंकांनी आपल्या ग्राहकांना 28 फेब्रुवारीपर्यंत बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगितलं आहे. ज्यांच्याकडे पॅनकार्ड नसेल ते बॅंकेत जाऊन 60 नंबरचा फॉर्म भरू शकतात. जनधन खातं आणि झीरो बॅलेन्स अकाउंट असणा-यांसाठी पॅनकार्डची माहिती देणं बंधनकारक नसेल.  

Web Title: ... and your bank account will be closed after 28 February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.