अंदमानातील आदिवासींनी केली अमेरिकन नागरिकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 03:39 PM2018-11-21T15:39:34+5:302018-11-21T15:43:10+5:30

अंदमानमधील आदिवासी जमातीने एका अमेरिकन नागरिकाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Andaman tribals kill American citizen | अंदमानातील आदिवासींनी केली अमेरिकन नागरिकाची हत्या

अंदमानातील आदिवासींनी केली अमेरिकन नागरिकाची हत्या

Next

अंदमान - अंदमानमधील आदिवासी जमातीने एका अमेरिकन नागरिकाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकऱणी पोलिसांनी कारवाई करत सात जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख उघड करण्यात आलेली नाही, मात्र त्यांचा संबंध येथील सेंटिनेलिस आदिवासी समुदायाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या अमेरिकन नागरिकाने आदिवासींच्या भागामध्ये घुसखोरी केल्याने त्याला ठार मारण्यात आले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंदमान बेटांच्या समुहातील सेंटिनेंल नावाच्या बेटावर सेंटिनेलिस आदिवासी जमातीचे वास्तव्य असून, या बेटांवर जाण्यास सर्वसामान्य व्यक्तींना मनाई आहे. मात्र हा अमेरिकन नागरिक मच्छिमारांच्या मदतीने बेकायदेशीररीत्या या बेटांवर गेला होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. या अमेरिकन नागरिकाची तीर मारून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

 हत्या करण्यात आलेल्या अमेरिकन नागरिकाची ओळख जॉन अॅलन चाऊ अशी झाली आहे. तसेच त्याचा मृतदेह उत्तर सेंटिनल बेटांवर सापडला आहे. या मृतदेहाबाबत स्थानिक मच्छिमारांनी पोलिसांना माहिती दिली होती. सेंटिनल द्विपावर राहणारी आदिवासी जमात धोकादायक मानली जाते.

या संदर्भात चेन्नई येथील दुतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अंदमान निकोबार बेटांवर एका अमेरिकन नागरिकाची हत्या झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही या प्रकरणी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. मात्र गोपनीयतेची बाब असल्याने आम्ही याबाबत अधिक काही माहिती शकत नाही."  

आंदमानातील सेंटिनल हे बेट सेंटिनेलिस या आदिवासी जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. येथील आदिवासी बाहेरील जगातील कुठल्याही व्यक्तींशी संपर्क साधत नाही. ही जमात सुमारे 60 हजार वर्षे जुनी असून, ते अद्यापही नैसर्गिक अवस्थेत राहतात. उत्तर सेंटिनल बेटांवरील या जमातीला आधुनिक जगाशी कोणत्याही प्रकारचे देणेघेणे नाही. तसेच ते बाहेरील लोकांनाही आपल्याशी कोणताही संपर्क ठेवू देत नाहीत. तसा प्रयत्न कुणी केल्यास ते त्यांच्यावर हल्ला करतात.  

Web Title: Andaman tribals kill American citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.