भयंकर! लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 09:41 AM2022-02-07T09:41:23+5:302022-02-07T09:47:22+5:30
Andhra Pradesh Accident : भरधाव वेगात आलेली लॉरीने कारला धडक दिल्याने कारमधील लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमध्ये रविवारी एक भीषण अपघात झाला असून यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगात आलेली लॉरी (Lorry) ने कारला धडक दिल्याने कारमधील लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली गावात हा अपघात घडला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले सर्व लोक हे उरवाकोंडा येथील रहिवासी असून कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथे लग्नासाठी गेले होते.
लग्नाहून आपल्या गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. याप्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उरवाकोंडा पोलीस करत आहेत. अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटली नसून पोलीस मृतांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत. कर्नाटकातील बेल्लारी येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी उरवाकोंडा येथील एक कुटुंब आपल्या इनोव्हा कारने गेले होते. लग्नाहून परतत असताना अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या लॉरीने त्यांच्या कारला भीषण टक्कर दिली.
Andhra Pradesh | 8 people died & 1 critically injured after a car in which they were traveling hit a lorry at Budagavi village of Anantapuram district. Police registered a case & further investigation underway: Venkata Swamy, Sub Inspector of police, Uravakonda Police Station
— ANI (@ANI) February 6, 2022
अपघात इतका भीषण होता की यात कारमधील 8 जण जागीच ठार झाले तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. मात्र उपचारादरम्यान आता मृत्यू झाला आहे. गाडीचा चेंदामेंदा झालाय. या घटनेमुळे उरवाकोंडा गावावर शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
In a ghastly #roadaccident 8 people died and 1 critically injured after a collision between a lorry and an Innova vehicle near #Uravakonda of #Anantapur dist.
— Surya Reddy (@jsuryareddy67) February 6, 2022
Victims were returning from #Ballari after attending a marriage.#AndhraPradeshpic.twitter.com/OV81kvHQna