VIDEO: लाईव्ह डिबेटमध्ये गोंधळ, भाजपा नेत्याला फेकून मारली चप्पल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 02:43 PM2021-02-24T14:43:54+5:302021-02-24T14:53:11+5:30
Andhra Pradesh BJP leader hit with slippers : आंध्र प्रदेशातील तेलुगु न्यूज चॅनेलवरील लाईव्ह चर्चेमध्ये असे काही घडले, की जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अमरावती : न्यूज चॅनेलवर एखाद्या मुद्द्यावरून होणाऱ्या चर्चेदरम्यान वाद-विवाद होताना तुम्ही पाहिलेच असेल. सत्ताधारी आणि विरोधकांच्या वक्तव्यावरून होणारे वाद देखील सामान्य आहेत. मात्र, आंध्र प्रदेशातील तेलुगु न्यूज चॅनेलवरील लाईव्ह चर्चेमध्ये असे काही घडले, की जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चॅनेलवरील चर्चेदरम्यान वाद झाला आणि चर्चेत सहभागी एका सदस्याने भाजपा नेत्याला चक्क चप्पल फेकून मारल्याचा प्रकार घडला. (andhra pradesh bjp leader vishnu vardhan reddy with slippers in live debate telugu news channel)
आंध्र प्रदेशातील जगन सरकारच्या तीन राजधानींच्या प्रस्तावानंतर अमरावतीत काम जवळजवळ थांबवले आहे. राजधानीसाठी ४३४ दिवसांपासून शेतकरी व महिलांचे आंदोलन सुरु केले. अशा परिस्थितीत न्यूज चॅनलने मंगळवारी एक लाईव्ह चर्चा केली. या चर्चेत अमरावती प्रदेशच्या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव, भाजपा प्रदेश सरचिटणीस विष्णुवर्धन रेड्डी आणि इतर लोक राजधानी अमरावतीबाबतच्या चर्चेत सहाभागी होते.
या चर्चेवेळी भाजपाच्या विष्णुवर्धन रेड्डी यांनी डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव यांचे तेलुगू देसम पक्षासोबत ( टीडीपी) संबंध असल्याचा आरोप केला. यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली. मात्र, जेव्हा विष्णुवर्धन रेड्डी वारंवार डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव यांचे टीडीपीसोबत संबंध असल्याचा पुनरुच्चार करु लागले, तेव्हा डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव यांचा संताप झाला आणि त्यांनी विष्णुवर्धन रेड्डी यांना चक्क चप्पल फेकून मारली.
BJP leader vishnu vardhan reddy hit with chappal by TDP supporter in live channel owned by TDP pic.twitter.com/KHlvqvb9uW
— Political Missile (@TeluguChegu) February 23, 2021
या घटनेमुळे लाईव्ह चर्चेचे प्रसारण करणार्या अँकरला ब्रेक घेण्यास भाग पडले. या घटनेनंतर चर्चेत भाग घेणारे इतर पॅनेलचे सदस्य आश्चर्यचकित झाले. भाजपाचे राज्य युनिटचे प्रमुख सोमू वीरराजू यांनी एका ट्विटमध्ये या घटनेचा निषेध केला आहे. राज्यसभेचे खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनीही घटनेचा निषेध केला. ते म्हणाले, "जर तेलुगू देसम पक्षाची (टीडीपी) यात कोणतीही भूमिका नसेल तर चंद्रबाबू नायडूंनी हल्लेखोर डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव यांच्या या कृत्याचा निषेध करावा."