आंध्रप्रदेशात लाच प्रकरणात अधिका-याला अटक, ८०० कोटीची मालमत्ता ?
By admin | Published: May 1, 2016 03:31 PM2016-05-01T15:31:33+5:302016-05-01T15:31:33+5:30
लाच, भ्रष्टाचार प्रकरणात अटक झालेल्या सरकारी अधिका-यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कोटयावधी रुपयांची काळी माया जमा केल्याचे समोर येते.
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १ - लाच, भ्रष्टाचार प्रकरणात अटक झालेल्या सरकारी अधिका-यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कोटयावधी रुपयांची काळी माया जमा केल्याचे समोर येते. आंध्रप्रदेशातील काकीनाडामध्ये अशाच एका लाच प्रकरणात अटक झालेल्या वाहतुक आयुक्ताची मालमत्ता १५० कोटींच्या घरात आहे.
आदीमूलम मोहन असे या वाहतुक आयुक्ताचे नाव असून, त्याच्याकडे पूर्व आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्याची वाहतूक आयुक्त म्हणून जबाबदारी होती. पंधरा वर्षात अनेक आमदार, सरकारे बदलली पण वाहतूक परवाने वाटपातूव मोहनने जवळपास १५० कोटींची मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.
स्थानिक माध्यमांनी मोहनची मालमत्ता आठशे कोटींच्या घरात असल्याचा दावा केला आहे. मोहन शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात सापडला. आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या तीन राज्यात नऊ ठिकाणी छापे मारल्यानंतर बेहिशोबी मालमत्तेचा मोठा स्त्रोत समोर आला आहे.
मोहनच्या बँकखात्यांचा शोध घेतल्यानंतर आणखी मालमत्ता उघड होतील असे अधिका-यांचे म्हणणे आहे. १९८८ साली सिंचन खात्यात सहाय्यक अभियंता म्हणून मोहनने करीयरला सुरुवात केली. त्यानंतर पुढची परीक्षा उर्तीण झाल्यानंतर त्याची रस्ते वाहतूक विभागात बदली झाली. १९९९ मध्ये त्याला उपायुक्त म्हणून बढती मिळाली. न्यायालयाने मोहनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशीतून त्याचे महिन्याचे बेहिशोबी उत्पन्न तीन कोटी रुपये असल्याची समोर आले आहे.