नशीबवान! कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याचं टोमॅटोमुळे बदललं आयुष्य; 45 दिवसांत कमावले 4 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 03:12 PM2023-07-29T15:12:38+5:302023-07-29T15:13:49+5:30

मुरली य़ांनी अवघ्या दीड महिन्यात 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे.

andhra pradesh farmer earns about 4 crore rupees in 45 days selling tomatoes | नशीबवान! कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याचं टोमॅटोमुळे बदललं आयुष्य; 45 दिवसांत कमावले 4 कोटी

नशीबवान! कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याचं टोमॅटोमुळे बदललं आयुष्य; 45 दिवसांत कमावले 4 कोटी

googlenewsNext

देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे अनेक शेतकरी ते विकून श्रीमंत होत आहेत. अनेक शेतकरी करोडपती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक प्रकार आता आंध्र प्रदेशातून समोर आला आहे. 48 वर्षीय मुरली हा आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. टोमॅटोच्या शेतीमुळे आपलं नशीब फळफळेल असा विचारही त्यांनी केला नसेल.

TOI नुसार, मुरली य़ांनी अवघ्या दीड महिन्यात 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे. ते कोलारमध्ये टोमॅटो विकण्यासाठी 130 किमी पेक्षा जास्त प्रवास करत आहे कारण येथील एपीएमसी चांगली किंमत देते. गेल्या आठ वर्षांपासून टोमॅटोची लागवड करत असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र टोमॅटोपासून एवढे मोठे उत्पन्न मिळेल, असे कधीच वाटले नव्हते.

मुरली यांच्या कुटुंबाला करकमंडला गावात वारसाहक्काने 12 एकर जमीन मिळाली, तर त्यांनी काही वर्षांपूर्वी आणखी 10 एकर जमीन खरेदी केली होती. किंबहुना, गेल्या वर्षी जुलैमध्ये किमती घसरल्याने त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्यावर दीड कोटी रुपयांचे कर्ज होते, जे त्यांनी बियाणे, खते, मजूर, वाहतूक आणि इतर लॉजिस्टिकवर गुंतवले. त्यांच्या गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने समस्यांचा सामना करावा लागतो. 

मुरारी यांनी 45 दिवसांत 4 कोटी रुपये कमावले असल्याचे सांगितले. आता जमिनीमध्ये पैसे गुंतवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बागायती व्यवसायात उतरण्याचा त्यांचा विचार आहे. आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी गावात सुमारे 20 एकर जमीन खरेदी करण्याची त्याची योजना आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: andhra pradesh farmer earns about 4 crore rupees in 45 days selling tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.