धक्कादायक! बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत असल्यानं वडिलांकडून मुलीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 09:50 PM2018-07-01T21:50:24+5:302018-07-01T21:53:21+5:30

रागाच्या भरात कुऱ्हाडीच्या दांड्यानं वडिलांची मुलीला मारहाण

andhra pradesh father kills daughter for talking with boyfriend on mobile | धक्कादायक! बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत असल्यानं वडिलांकडून मुलीची हत्या

धक्कादायक! बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत असल्यानं वडिलांकडून मुलीची हत्या

विजयवाडा: मुलगी प्रियकरासोबत बोलत असल्यानं संतापलेल्या वडिलांनी तिची हत्या केली आहे. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. टोटारावुलापाडू गावातील के. टी. कोटय्या यांनी त्यांची मुलगी चंद्रिकाची कुऱ्हाडीच्या दांड्यानं हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. बी. फार्मसीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या चंद्रिकानं दोनच दिवसांपूर्वी तिचा 20 वा वाढदिवस साजरा केला होता. कोटय्या यांना चंद्रिकाचं प्रेमसंबंध मंजूर नव्हते, अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

गुडलावल्लू महाविद्यालयात शिकणाऱ्या चंद्रिकानं शुक्रवारी वाढदिवसानंतर तिच्या प्रियकराविषयी घरी सांगितलं होतं. मात्र तिच्या आई-वडिलांना हे प्रेमसंबंध मंजूर नव्हते, अशी माहिती नंदिगामाचे डीएसपी टी. रादेश मुरली यांनी दिली. 'शनिवारी संध्याकाळी चंद्रिका तिच्या प्रियकरासोबत मोबाईलवर बोलत होती. कोटय्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांनी चंद्रिकाचं बोलणं ऐकलं. चंद्रिका पळून जाण्याची तयारी करत असल्याचा संशय कोटय्या यांना आला,' असं मुरली यांनी सांगितलं. 

चंद्रिका प्रियकराशी मोबाईलवर बोलत असल्यानं कोटय्या यांना राग अनावर झाला. यानंतर त्यांनी चंद्रिकाला कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारण्यास सुरुवात केली. त्यांनी चंद्रिकाच्या डोक्यावर अनेकदा कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारहाण केली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. चंद्रिकाच्या आईनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना चंद्रिकाचा जीव वाचवता आला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कोटय्या यांना अटक केली. त्यांच्या विरोधात कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: andhra pradesh father kills daughter for talking with boyfriend on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.