जगनमोहन रेड्डी यांनी जिंकले आंध्र प्रदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 05:28 AM2019-05-24T05:28:35+5:302019-05-24T05:29:44+5:30

आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत १७५ जागांपैकी वायएसआर काँग्रेसने १४८ जागा मिळविल्या.

Andhra Pradesh has won Jaganmohan Reddy | जगनमोहन रेड्डी यांनी जिंकले आंध्र प्रदेश

जगनमोहन रेड्डी यांनी जिंकले आंध्र प्रदेश

Next

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत १७५ जागांपैकी वायएसआर काँग्रेसने १४८ जागा मिळविल्या. जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांना चांगलाच धक्का दिला. त्यांच्या तेलुगू देसमला २६ तर पवन कल्याण यांच्या जनसेनेला एक जागा मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेस, भाजपला एकही जागा मिळाली नाही. आंध्र प्रदेशला जगनमोहन यांच्या रुपात नवा मुख्यमंत्री लाभणार असून, ते ३० मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे समजते.
>ओडिशा : पटनाईक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री
भूवनेश्वर : मोदींच्या लाटेतही ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे. पटनाईक हे सलग पाचव्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्री बनणार आहेत.बिजू जनता दलाचे (बिजद) प्रमुख नवीन पटनाईक हे गेल्या १९ वर्षांपासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. जनतेने त्यांना आणखी पाच वर्षे दिली. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका मात्र भाजपाने पटकावली आहे. २000 पासून काँग्रेस येथे प्रमुख विरोधी पक्ष होता. मावळत्या सभागृहात काँग्रेसच्या १६ जागा होत्या, तर भाजपाच्या १0 जागा होत्या. भाजपाने आपल्या जागा दुपटीपेक्षा जास्त वाढविल्या आहेत. काँग्रेसच्या जागा मात्र घटल्या.
>अरूणाचल प्रदेश : भाजप पुन्हा एकदा सत्ताधीश
इटानगर : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची जादू चाललेली असतानाच अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी भाजपने सत्ता कायम ठेवली आहे. ६० पैकी ३१ जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपने तीन जागा आधीच जिंकलेल्या होत्या. येथे प्रथमच निवडणूक लढवत असलेल्या जदयूने आपले खातेही उघडले आहे. काँग्रेसला तीन जागा जिंकता आल्या.
>सिक्किम : काट्याची टक्कर, चामलिंग सरकार येणार?
गंगटोक : ३२ जागा असलेल्या सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीत काट्याची टक्कर पाहावयास मिळाली. येथे सत्ताधारी सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट (एसडीएफ) व विरोधी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (एसकेएम) चुरस निर्माण झाली. दोन्ही पक्षांना प्रत्येकी १६ जागा मिळाल्या होत्या. मुख्यमंत्री व एसडीएफ प्रमुख पवन चामलिंग यांनी पोकलोक कामरंग मतदारसंघातून विजय मिळवला.

Web Title: Andhra Pradesh has won Jaganmohan Reddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.