आंध्र प्रदेशात दगडाच्या खाणीत स्फोट, 11 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 12:06 AM2018-08-04T00:06:48+5:302018-08-04T00:07:10+5:30
आंध्रप्रदेशातील एका दगडाच्या खाणीत स्फोट झाला. या स्फोटात 11 कामगारांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कुरनूल : आंध्र प्रदेशातील एका दगडाच्या खाणीत स्फोट झाला. या स्फोटात 11 कामगारांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री स्फोट झाला. यामध्ये 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. जखमींना येथील जवळच्याच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
#UPDATE: Two more people died in the stone quarry blast in Kurnool's Hathi Belgal, taking the death toll to 11. Four people are injured & admitted to the hospital. https://t.co/cCOc3IO1tN
— ANI (@ANI) August 3, 2018
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून त्यांनी स्फोटातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी अधिका-यांना आदेश दिले आहेत. दरम्यान, या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Andhra Pradesh: 9 dead and several injured in stone quarry blast in Kurnool's Hathi Belgal. pic.twitter.com/lqWhSYquh7
— ANI (@ANI) August 3, 2018