'जिन्ना टॉवर'चे नाव बदलून 'अब्दुल कलाम टॉवर' करा, नामांतरासाठी भाजप आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 17:41 IST2021-12-31T17:41:47+5:302021-12-31T17:41:55+5:30
आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे ‘जिन्ना टॉवर’ आहे. भाजपने या टॉवरचे नाव बदलून अब्दुल कलाम टॉवर करण्याची मागणी केली आहे.

'जिन्ना टॉवर'चे नाव बदलून 'अब्दुल कलाम टॉवर' करा, नामांतरासाठी भाजप आक्रमक
हैदराबाद:आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे एक टॉवर आहे. आता या टॉवरचे नाव बदल्यावरुन राजकीय वातावारण चांगलेच तापले आहे. या टॉवरच्या नामांत्तराचा मुद्दा भाजपने उचलून धरला असून, नाव न बदल्यास तोडण्याचा इशारा दिला आहे.
कधी बांधले टॉवर?
असे म्हटले जाते की, 1945 मध्ये फाळणीपूर्वी जिन्ना एका सार्वजनिक सभेला संबोधित करण्यासाठी गुंटूरला आले होते. तेव्हा स्थानिक मुस्लिमांनी त्यांच्या नावावर एका मिनाराचे नाव ठेवले. या टॉवरला घुमटाच्या आकाराची रचना असलेले सहा खांब आहेत आणि स्थानिक लोक ते सौहार्द आणि शांततेचे प्रतीक मानतात. एवढेच नाही तर या जागेला जिन्ना सेंटर म्हणूनही ओळखले जाते.
टॉवरला अब्दुल कलामांचे नाव द्या
आंध्र प्रदेश सरकारने तात्काळ जिन्ना टॉवरचे नाव बदलावे, अशी मागणी तेलंगणातील भाजप आमदार राजा सिंह यांनी केली आहे. देशाची फाळणी आणि अनेक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तीचे नाव तुम्ही कसे वापरत राहू शकता, असा सवाल त्यांनी केला. तसेच, जिन्नांचे नाव बदलून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव त्या टॉवरला द्यावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी गुंटूर महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.
नामांत्तरासाठी भाजपचा अल्टीमेटम
भाजप नेते व्ही. जयप्रकाश नारायण म्हणाले की, 'गुंटूरसाठी हा काळा डाग आहे. हा जिन्ना टॉवर आपला स्वाभिमान दुखावतो. प्रशासनाने त्याचे नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम केले नाही तर ते हटवण्यासाठी आम्ही अयोध्येप्रमाणे कारसेवा करू, असा अल्टीमेटम भाजपने दिला आहे. तसेच, सत्ताधारी आणि आधीच्या सरकारांनी व्होट बँकेच्या राजकारणासाठी नाव बदलले नाही, असा आरोपही केला आहे.