धक्कादायक; सावत्र बापाने मुलीला नदीत ढकलले, तिने पाईपला लटकून लावला पोलिसांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 04:33 PM2023-08-07T16:33:59+5:302023-08-07T16:34:33+5:30

पत्नी आणि दोन सावत्र मुलींना गोदावरी नदीत ढकलल्याची घटना घडली आहे. जाणून घ्या प्रकरण...

Andhra Pradesh News: stepfather pushed his daughter into godavari river, she hanged herself on pipe and called police | धक्कादायक; सावत्र बापाने मुलीला नदीत ढकलले, तिने पाईपला लटकून लावला पोलिसांना फोन

धक्कादायक; सावत्र बापाने मुलीला नदीत ढकलले, तिने पाईपला लटकून लावला पोलिसांना फोन

googlenewsNext

Andhra Pradesh Crime News: आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र बापाने पत्नी आणि दोन मुलींना गोदावरी नदीत ढकलून दिले. या घटनेत पत्नी आणि एक मुलगी नदीनत वाहून गेली तर दुसऱ्या मुलीने पाईपला लटकून आपला जीव वाचवला. यानंतर तिने 100 क्रमांकावर फोन केला आणि पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी मुलीला सुरक्षित बाहेर काढले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 6 ऑगस्ट रोजी पहाटे 3:50 वाजता घडली. सुरेश नावाच्या व्यक्तीने पत्नी पुप्पला सुहासी (36), मुलगी कीर्तना (13) आणि जर्सी (1) यांना गोदावरी नदीच्या पुलावरुन खाली ढकलून दिले. पुप्पला आणि जर्सी नदीत वाहून गेल्या, पण कीर्तनाने पुलाखालील प्लॅस्टिकचा पाइप पकडून स्वतःचा जीव वाचवला. यानंतर तिने तात्काळ तिच्या फोनवरुन पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली.  माहिती मिळताच रावुलपालम पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांना मुलगी अत्यंत धोकादायक अवस्थेत लटकलेली आढळली. 

यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीची सुटका केली. मुलीची सुटका केल्यानंतर तिच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. आईसोबत राहणाऱ्या सावत्र वडील सुरेशने त्यांना राजमुंद्री येथे नेले आणि रावुलापलेम ब्रिजवर सेल्फी घेण्याच्या बहाण्याने तिघांना नदीत ढकलून दिल्याचे सांगितले.  पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, एक पथक बोटीच्या साहाय्याने गोदावरीत मुलीच्या आईचा शोध घेत आहे तर दुसरे पथक फरार असलेल्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Andhra Pradesh News: stepfather pushed his daughter into godavari river, she hanged herself on pipe and called police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.