विधानसभा निवडणुकीत NDAची बाजी! आंध्र प्रदेश, ओडिशामध्ये भाजपची सत्ता जवळपास निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 01:45 PM2024-06-04T13:45:54+5:302024-06-04T13:47:19+5:30

Andhra Pradesh and Odisha Assembly Result 2024: ओडिशात भाजपाची दमदार कामगिरी, आंध्रप्रदेशात NDAचा घटक तेलगु देसमला मोठे यश

Andhra Pradesh Odisha assembly election result counting 2024 live update bjp Tdp bjd ysrcp winning candidate | विधानसभा निवडणुकीत NDAची बाजी! आंध्र प्रदेश, ओडिशामध्ये भाजपची सत्ता जवळपास निश्चित

विधानसभा निवडणुकीत NDAची बाजी! आंध्र प्रदेश, ओडिशामध्ये भाजपची सत्ता जवळपास निश्चित

Andhra Pradesh and Odisha Assembly Result 2024: लोकसभा निवडणुकी सोबतच आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. आंध्र प्रदेशात भाजपप्रणित NDA ची सत्ता येणे जवळपास निश्चित आहे. आंध्रमध्ये भाजपा, तेलगु देसम आणि जनसेना या तीन पक्षांनी मिळून निवडणून लढवली असून TDP ने मोठे यश मिळवले आहे. दुसरीकडे ओडिशामध्ये भाजपाने दमदार कामगिरी केली आहे. १४७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ७२ जागांवर तर बीजेडीने ५७ जागांवर आघाडी घेतली आहे.

आंध्र प्रदेशात तेलगु देसम-भाजपला संधी

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत NDAचा घटक पक्ष असलेल्या TDP ने १७५ पैकी १३१ जागांवर आघाडी घेतली असून राज्यात मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्याचवेळी त्यांच्या सहकारी पक्ष जनसेना १९ जागांवर आघाडीवर असून भाजप ७ जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी YSRCP ला केवळ १८ जागांवर आघाडी घेता आली. त्यामुळे आता आंध्र प्रदेशात सत्ताबदल होताना दिसत आहे.

ओडिशात भाजप ७७ जागांवर आघाडीवर

आंध्र प्रदेशात घटक पक्षाने विजय मिळवला असला तरी ओडिशामध्ये १४७ विधानसभा जागांपैकी भाजपा आघाडीवर आहे. भाजपा ७३ जागांवर आघाडीवर आहे. तर बीजु जनता दल ४९ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय ओडिशात काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे, तर अपक्षांनी ४ जागांवर आघाडी घेतली.

आंध्र प्रदेशात सरकार बदलण्याची प्रथा

निवडणुकीच्या इतिहासात आंध्र प्रदेशात दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा आहे. आंध्र प्रदेशमध्ये आधी तेलुगु देसम पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले, परंतु 2019 मध्ये वायएसआर काँग्रेसने मोठा विजय मिळवला. टीडीपी २३ जागांवर घसरली. यावेळी पुन्हा तेलगु देसम पक्षाने विजय मिळवला. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी २०२४ मध्ये तेलुगू देसम पार्टी पुन्हा NDAचा भाग बनली होती. त्यामुळे भाजपाला दोनही विधानसभा निवडणुकीत बाजी मारता आली.
 

Web Title: Andhra Pradesh Odisha assembly election result counting 2024 live update bjp Tdp bjd ysrcp winning candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.