VIDEO: आंध्र प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई; 200 कोटींच्या 2 लाख किलो गांजाची होळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 11:41 AM2022-02-13T11:41:34+5:302022-02-13T14:22:21+5:30
आंध्र प्रदेश पोलिसांनी तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा 2 लाख किलोग्राम गांजा जाळून नष्ट केला आहे.
विशाखापट्टनम:आंध्र प्रदेशपोलिसांनी शनिवारी गांजा तस्करीवर केलेल्या एका कारवाईची देशभर चर्चा होत आहे. शनिवारी आंध्र पोलिसांनी तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा 2 लाख किलोग्राम गांजा जाळून नष्ट केला आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी सांगितले की, राज्याच्या किनारी जिल्ह्यांमधून अनेक वर्षांपासून हा गांजा जप्त करण्यात येत होता.
आंध्र पोलिसांनी गांजा जाळण्याच्या या घटनेला ऐतिहासिक घटना म्हटले आहे. पोलिसांनी या गांजा जाळण्याच्या ऐतिहासिक घटनेचा व्हिडिओही ट्विट केला आहे. पोलिस अधिकारी मोठ्या थाटामाटात गांजाचा ढीग पेटवत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यासाठी गांजाच्या ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले होते.
Historic occasion in the annals of #APPolice: An unprecedented 2La Kgs of seized Ganja Destruction by #APPolice along with Drug Disposable Committee, Special Enforcement Bureau at Koduru(V),Anakapalli(M), #Visakhapatnam District.#MissionDrugFreeIndia@narcoticsbureaupic.twitter.com/IMHlPmilP2
— Andhra Pradesh Police (@APPOLICE100) February 12, 2022
अनेक जिल्ह्यात गांजाची लागवड
एका मोकळ्या मैदानात गांजाचे अनेक ढीग केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या सर्व गांजाला पेटवण्यासाठी त्यावर लाकंड ठेवली आहेत. तसेच, मैदानात पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित असून ते एकएक करत ढिगाऱ्याला आग लावत आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक गौतम सावंग म्हणाले की, बंदी घातलेले माओवादी ओडिशातील 23 जिल्हे आणि विशाखापट्टणम जिल्ह्यातील 11 मंडळांमध्ये ही गांजाची लागवड करत आहेत.
गांजाविरोधा मोठी कारवाई
ते पुढे म्हणाले की, ऑपरेशन 'परिवर्तन' अंतर्गत पोलिसांच्या 406 विशेष पथकांनी 11 मंडळांमधील 313 गावांमधील गांजाच्या बागा नष्ट केल्या आहेत. आंध्र-ओडिशा सीमेवर गांजाची लागवड आणि अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीमध्ये विविध राज्यांतील अनेक गट सामील आहेत. याप्रकरणी 1,500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून 577 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.