Video - राजकारण तापलं! मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला पोलिसांनी कारसह क्रेननं उचललं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 12:41 PM2022-11-30T12:41:46+5:302022-11-30T12:50:44+5:30
आंदोलन करत असलेल्या शर्मिला यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांनी त्यांना एक किलोमीटर आधीच रोखलं. शर्मिला रेड्डी स्वत:चं एसयूव्ही कार चालवत होत्या.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीची कार हैदराबाद पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने उचलली आहे. विशेष म्हणजे जगन यांची बहीण वायएसआरटीपीच्या प्रमुख शर्मिला रेड्डी कारमध्ये असताना हा संपूर्ण प्रकार घडला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शर्मिला रेड्डी गेल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील सोमाजीगुडा परिसरात ही घटना घडली. शर्मिला रेड्डींनी केसीआर यांच्या घराला घेराव घालण्याची घोषणा केली होती. आंदोलन करत असलेल्या शर्मिला यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांनी त्यांना एक किलोमीटर आधीच रोखलं. शर्मिला रेड्डी स्वत:चं एसयूव्ही कार चालवत होत्या.
#WATCH | Hyderabad: Police drags away the car of YSRTP Chief Sharmila Reddy with the help of a crane, even as she sits inside it for protesting against the Telangana CM KCR pic.twitter.com/ojWVPmUciW
— ANI (@ANI) November 29, 2022
पोलिसांनी कार थांबवल्यानंतर शर्मिला यांनी कार आतून लॉक केली. पोलिसांनी लॉक तोडण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी कार टो केली. शर्मिला रेड्डी आंध्र प्रदेशच्या जगन मोहन रेड्डी यांची बहीण आहे. त्यांचे वडील वाय एस राजशेखर रेड्डी अविभाजित आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. जुलै 2021 मध्ये रेड्डी यांनी वायएसआर तेलंगणा पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली.
एक दिवसापूर्वीच अज्ञातांनी शर्मिला यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्याविरोधात शर्मिला गो बॅक अशा घोषणा दिल्या. घोषणाबाजी करणाऱ्यांनी ज्वलनशील पदार्थ टाकून बस पेटवली. त्यावेळी बसमध्ये 20 जण होते. ते वेळीच खाली उतरले. त्यामुळे अनर्थ टळला. शर्मिला कार्यकर्त्यांसोबत नरसम्पेटा येथे जेवणासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"