Andhra Pradesh: वीज कपातीमुळे रुग्णांची वणवण; मोबाईल आणि मेणबत्तीच्या उजेडात महिलेची प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 05:13 PM2022-04-08T17:13:25+5:302022-04-08T17:13:55+5:30

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील नरसिपट्टणम येथील एका रुग्णालयात लाईट नसल्यामुळे मोबाईल आणि मेणबत्तीच्या उजेडात महिलेची प्रसूती केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Andhra Pradesh | Power Cut | Woman gave birth under mobile and candle light In Hospital | Andhra Pradesh: वीज कपातीमुळे रुग्णांची वणवण; मोबाईल आणि मेणबत्तीच्या उजेडात महिलेची प्रसूती

Andhra Pradesh: वीज कपातीमुळे रुग्णांची वणवण; मोबाईल आणि मेणबत्तीच्या उजेडात महिलेची प्रसूती

Next

नरसिपट्टणम: सध्या आंध्र प्रदेशातील नागरिकांना प्रचंड वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती इतकी बिटक झाली आहे की, रुग्णालयांनाही वीज मिळत नाहीये. यातच राज्यातील नरसिपट्टणम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नरसिपट्टणममधील एनटीआर हॉस्पिटलमध्ये वीज नसल्यामुळे एका महिलेची मोबाईलच्या उजेडात प्रसूती करावी लागली. सुदैवाने आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत.

महिलेच्या पतीने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी प्रसूती वेदना होत असल्याने महिलेला एनटीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी रुग्णालयात वीज नव्हती. परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयात जनरेटर किंवा इतर बॅकअप उपलब्ध नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकरात लवकर सेल फोन, मेणबत्त्या आणि टॉर्चची व्यवस्था करा. याच मेणबत्त्या आणि मोबाईलच्या उजेडात महिलेची प्रसूती करण्यात आली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 
दुसरीकडे जांगरेड्डीगुडेम येथील सरकारी रुग्णालयातही अशीच स्थिती पाहायला मिळाली. रात्रभर वीज नसल्याने रुग्ण वॉर्डात अंधारात मोबाईलचे दिवे वापरताना दिसत होते. अशा परिस्थितीत त्यांना विश्रांतीही घेता येत नसल्याचे रुग्णांनी सांगितले. यावर रुग्णालय प्रशासनाने जनरेटरमध्ये डिझेल नसल्याने वीज उपलब्ध नसल्याचे सांगितले. रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राज्यात 50 टक्के वीज कपात जाहीर
वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश वीज विभागाने 50 टक्के वीज कपातीची घोषणा केली आहे. त्यामुळे जनतेला त्रास होत आहे. राज्यात दररोज सुमारे पाच लाख युनिट विजेचा तुटवडा भासत आहे. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जगन मोहन रेड्डी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. 

Web Title: Andhra Pradesh | Power Cut | Woman gave birth under mobile and candle light In Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.