Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसवर पुन्हा दगडफेक, खिडकीच्या काचा फोडल्या, एक लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 10:23 AM2023-04-06T10:23:10+5:302023-04-06T10:23:32+5:30

Vande Bharat Express : विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस विशाखापट्टणम स्थानकातून कोच केअर सेंटरकडे देखभालीसाठी जात असताना तिच्यावर दगडफेक करण्यात आली.

andhra pradesh stones pelted at vande bharat express again in visakhapatnam | Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसवर पुन्हा दगडफेक, खिडकीच्या काचा फोडल्या, एक लाखाचे नुकसान

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसवर पुन्हा दगडफेक, खिडकीच्या काचा फोडल्या, एक लाखाचे नुकसान

googlenewsNext

आंध्र प्रदेश : विशाखापट्टणममध्ये बुधवारी पुन्हा एकदा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. विशाखापट्टणमहून निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला काही अज्ञातांनी लक्ष्य केले आणि दगडफेक करून सी-8 कोचच्या खिडकीच्या काचा फोडल्या. या घटनेनंतर एक्स्प्रेसची नियोजित सुटण्याची वेळ पुन्हा बदलावी लागली. विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस विशाखापट्टणम स्थानकातून कोच केअर सेंटरकडे देखभालीसाठी जात असताना तिच्यावर दगडफेक करण्यात आली.

एएनआय न्यूज एजन्सीनुसार, वॉल्टेअर डिव्हिजन रेल्वेच्या अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे की, बुधवारी विशाखापट्टणमहून निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस 05:45 च्या नियोजित सुटण्याच्या वेळेऐवजी 09:45 वाजता बदलण्यात आली. पोलिसांनी केलेल्या दगडफेकीमुळे सी-8 कोचचा चक्काचूर झाला. याआधी जानेवारी महिन्यात आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात वंदे भारत एक्स्प्रेसच्या देखभालीदरम्यान दगडफेक करण्यात आली होती. विशाखापट्टणममधील कांचरापलेमजवळ वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्याची विंडशील्ड खराब झाली आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) अनुप कुमार सेतुपती यांनी एएनआयला सांगितले की, ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. कांचरापालेमजवळ काही अज्ञातांनी कोचवर दगडफेक केल्याने नवीन वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्याच्या काचा फुटल्या. ही एक्स्प्रेस देखभालीसाठी विशाखापट्टणमला पोहोचली होती. तसेच, आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहोत. आमचे आरपीएफ पोलीस दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यांना पकडण्यात आले की, योग्य ती शिक्षा केली जाईल. रेल्वे ही जनतेच्या पैशाची आहे. खिडकीच्या काचेची किंमत अंदाजे एक लाख आहे.

Web Title: andhra pradesh stones pelted at vande bharat express again in visakhapatnam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.