आंध्रप्रदेशात आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण,ट्रेनचे आठ डबे जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2016 09:08 AM2016-02-01T09:08:47+5:302016-02-01T11:32:32+5:30
आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्हयात कापू समाजाच्या आंदोलनला रविवारी रात्री हिंसक वळण लागले. मागास जातीचा दर्जा आणि आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत होते.
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १ - आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्हयात कापू समाजाच्या आंदोलनला रविवारी हिंसक वळण लागले. मागास जातीचा दर्जा आणि आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत होते. आंदोलना दरम्यान हिंसक झालेल्या जमावाने दोन पोलिस स्थानकांना आग लावली तसेच २५ गाडया आणि रत्नाचल एक्सप्रेसचे आठ डब्बे जाळले.
रत्नाचल एक्सप्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही मात्र हिंसाचारामध्ये १५ पोलिस जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग १६ वरील वाहतूक आणि रेल्वे वाहतूक रोखून धरली होती. कापू समाजाने रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले.
पोलिस आणि प्रशासन आता रेल्वेमार्ग तपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करत आहेत. या आंदोलनाचा मुख्य नेता एम.पद्मनाभम यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले असून, हिंसाचार घडवून केलेला नाही असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याशी चर्चा करुन मार्ग निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.