आंध्रप्रदेशात भिंत कोसळली, सात मजूर ठार

By admin | Published: May 15, 2016 10:14 AM2016-05-15T10:14:09+5:302016-05-15T10:23:31+5:30

आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात शनिवारी रात्री बांधकाम अवस्थेत असलेल्या एका इमारतीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत सात मजूरांचा मृत्यू झाला.

In Andhra Pradesh the wall collapses, killing seven people | आंध्रप्रदेशात भिंत कोसळली, सात मजूर ठार

आंध्रप्रदेशात भिंत कोसळली, सात मजूर ठार

Next

ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. १५ - आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात शनिवारी रात्री बांधकाम अवस्थेत असलेल्या एका इमारतीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत सात मजूरांचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूरम भागामध्ये प्रस्तावित इमारतीसाठी तळघर खणण्याचे काम सुरु असताना ही भिंत कोसळली. 
 
खणण्याचे काम सुरु असताना अचानक भूमिस्खलन होऊन आठ मजूर भिंतीखाली अडकले अशी माहिती पोलिसांनी दिली. एक मजूराची सुटका करण्यात यश आले. दुर्घटनेची माहिती कळताच आंध्रप्रदेश विधानसभेचे विधानसभाध्यक्ष कोडेला शिवाप्रसाद राव, आमदार अलापती राजेंद्र प्रसाद, एन आनंद बाबू, जिल्हाधिकारी कांतीलाल दांडे आणि अन्य अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 
 
घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गृहमंत्री एन. चायना राजप्पा यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्याचा आढावा घेण्यास सांगितले आहे. 

Web Title: In Andhra Pradesh the wall collapses, killing seven people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.