आंध्रात वायएसआर काँग्रेसने मिळविला ११ मनपात विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 01:57 AM2021-03-15T01:57:31+5:302021-03-15T01:58:35+5:30
२०१९मध्ये आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांत तेलुगू देसम पक्षाचा पराभव करून वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी हे त्या राज्याचे मुख्यमंत्री झाले.
अमरावती: आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस या पक्षाने राज्यात निवडणुका झालेल्या सर्व ११ महानगरपालिका तसेच ७१ नगरपालिकांपैकी ६९ ठिकाणी विजय मिळवून तेलुगू देसम, भाजप, काँग्रेस या पक्षांना धूळ चारली आहे. दोन नगरपालिकांमध्ये तेलुगू देसम पक्षाला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी रविवारी पार पडली. (In Andhra, YSR Congress won 11 Municipal corporation )
२०१९मध्ये आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांत तेलुगू देसम पक्षाचा पराभव करून वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी हे त्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांची राज्यावरील राजकीय पकड अजिबात ढिली झालेली नाही हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रविवारी लागलेल्या निकालातून स्पष्ट
झाले.