Vizag Gas Leak : आंध्र प्रदेशला सर्वोतोपरी मदत करणार; पंतप्रधान मोदींनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 04:56 PM2020-05-07T16:56:51+5:302020-05-07T17:06:50+5:30
Visakhapatnam, Vizag Gas Leakage News : आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत 8 ते 10 जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.
नवी दिल्ली - देश कोरोना संकटात सामना करत असतानाच आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे गुरुवारी (7 मे) विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत 8 ते 10 जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. 300 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच 5 हजारांपेक्षा जास्त लोक या गॅसगळतीनं आजारी पडले आहेत. या सर्व प्रकारावर विशाखापट्टणमच्या पश्चिम विभागाच्या एसीपींनी माहिती दिली आहे. 5000 टनाच्या दोन टँकमधून ही गॅसगळती झाली आहे. या गॅसगळतीची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दुर्घटनेनंतर काही तासातच पंतप्रधानांनी या घटनेचा आढावा घेतला. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेतली. आपण केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी चर्चा केल्याची माहिती स्वत: पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच विशाखापट्टणममधील सर्व नागरिक सुरक्षित राहावे यासाठी आपण प्रार्थना केल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
Spoke to officials of MHA and NDMA regarding the situation in Visakhapatnam, which is being monitored closely.
— Narendra Modi (@narendramodi) May 7, 2020
I pray for everyone’s safety and well-being in Visakhapatnam.
जगनमोहन रेड्डी यांच्याशी नरेंद्र मोदी यांची चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. आंध्र प्रदेशला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना दिल्याचे पंतप्रधान कार्यालयानेही सांगितले आहे. राज्याचा प्रमुख म्हणून मृतांच्या कुटुंबीयांसोबत आपण सर्वोतोपरी आहोत, असे म्हणत या दुर्घटनेतील मृतांना 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा जगनमोहन यांनी केली. तर, रुग्णालयातील गंभीर जखमींना (व्हेंटीलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना) 10 लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. रुग्णालयात दाखल असलेल्यांना 1 लाख आणि रुग्णालयातून प्राथमिक उपचार घेऊन घरी गेलेल्या नागरिकांना 25 हजार रुपये देण्याचेही जगनमोहन यांनी जाहीर केले.
PM Narendra Modi has spoken to Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy regarding the situation in Visakhapatnam. He assured all help and support: Prime Minister's Office. #VizagGasLeakpic.twitter.com/aOelkNxi9N
— ANI (@ANI) May 7, 2020
5000 टनाच्या दोन टँकमधून ही गॅसगळती झाली आहे. हा कारखाना मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बंद होता. त्यामुळे टाक्यांमध्ये आपोआप रासायनिक प्रक्रिया झाली असून, उष्णतेनं ताप निर्माण झाला आणि टाक्यांमधून गळतीला सुरुवात झाली. गॅस गळती झाली तेव्हा लोक गाढ झोपेत होते, असंही त्यांनी सांगितलं आहे.
An ex-gratia of Rs 1 crore each to be given to the families of the deceased in the #VizagGasLeakage incident. Ex gratia of Rs 10 lakhs to be given to those on ventilator: Andhra Pradesh Chief Minister YS Jaganmohan Reddy pic.twitter.com/KgtxGiPdbD
— ANI (@ANI) May 7, 2020
एनडीआरएफचे महासंचालक सत्यनारायण प्रधान म्हणाले की, एनडीआरएफ (नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स)च्या वतीने राबविण्यात येणा-या मदत आणि बचावकार्यात 27 लोकांचा सहभाग आहे, जे औद्योगिक गळती रोखण्यातील तज्ज्ञ आहेत. 80 ते 90 टक्के लोकांना या गॅसगळतीतून वाचवण्यात आलं आहे. अधिका-यांनी सांगितले की, हा प्लांट गोपालापट्टनम भागात आहे. या भागातील लोकांनी डोळ्यांमध्ये जळजळ, श्वास घेण्यात अडचण, मळमळ आणि शरीरावर लाल पुरळ येत असल्याची तक्रार केली. जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद म्हणाले की, गॅसगळतीमुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सुमारे 70 लोकांना उपचारासाठी किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित झालेल्या फुटेजमध्ये लोक रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसतात.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ATMमधून पैसे काढायला घाबरता?, मग 'या' दुकानातून काढू शकता रक्कम
CoronaVirus News : योगी सरकारच्या निर्णयावर साक्षी महाराज नाराज; म्हणाले...
CoronaVirus News : 'कोरोना व्हायरसचा प्रसार वुहानच्या प्रयोगशाळेतून झाला'; अमेरिका ठाम