पाण्यासाठी आयुक्तांच्या घरावर मोर्चा संत नामदेवनगरातील नागरिकांचा संताप : नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याच्या मागणीसाठी घातला गोंधळ
By admin | Published: April 24, 2016 07:00 PM2016-04-24T19:00:58+5:302016-04-24T19:00:58+5:30
जळगाव : जुन्या पाईपलाईनवर जास्त नळकनेक्शन झाल्याने पाणीपुरवठाच होत नसून त्याऐवजी नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या संत नामदेव नगरातील नागरिकांनी रविवारी मनपा आयुक्तांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानासमोर गोंधळ घालत निदर्शने केली. अखेर आयुक्तांनी काम तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत होऊन परतला.
Next
ज गाव : जुन्या पाईपलाईनवर जास्त नळकनेक्शन झाल्याने पाणीपुरवठाच होत नसून त्याऐवजी नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या संत नामदेव नगरातील नागरिकांनी रविवारी मनपा आयुक्तांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानासमोर गोंधळ घालत निदर्शने केली. अखेर आयुक्तांनी काम तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत होऊन परतला.पाच वर्षांपासून पाठपुरावाइंद्रप्रस्थनगर भागातील संत नामदेवनगर परिसरात पूर्वी घरे कमी असल्याने मनपाने अडीच इंची पाईपलाईन टाकली होती. तेव्हा तेथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत होते. मात्र नंतर विस्तार झाल्याने घरे वाढली. नळकनेक्शनही वाढले. त्यातच जास्त पाणी मिळावे म्हणून नागरिकांकडून पाणी आल्यावर नळाला मोटारी लावणे सुरू झाले. त्यामुळे शेवटच्या भागात पाणी पोहोचत नसल्याने त्या नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत नागरिकांनी गेल्या ५ वर्षांपासून मनपा पाणीपुरवठा विभाग व आयुक्तांकडे निवेदन देऊन व पाठपुरावा करूनही दखल घेतली गेलेली नाही. घरासमोर घातला गोंधळरविवारी सकाळी या भागात पाणीपुरवठा होणार होता. मात्र पाणीच मिळत नसल्याने चिडलेल्या नागरिकांनी थेट शिवाजीनगरातील मनपा आयुक्तांच्या निवासस्थानकडे मोर्चा वळविला. तेथे सुरक्षा रक्षकाने प्रवेशद्वारावर अडविल्यावर नागरिकांनी गोंधळ घातला. त्यामुळे अखेर आयुक्तांनी बाहेर येऊन नागरिकांशी चर्चा केली. -------काम मार्गी लावण्याचे आश्वासनमनपा आयुक्त संजय कापडणीस हे मोर्चेकर्यांना सामोरे गेले. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांना याबाबत विचारणा केली. मात्र खडके बाहेरगावी असल्याने त्यांनी शाखा अभियंता सुनील तायडे यांना तेथे पाठविले. त्यांनी त्याभागातील वस्ती वाढल्याने पाईपलाईनची क्षमता कमी पडत असल्याचे व नवीन पाईपलाईन आमदार निधीतून प्रस्तावित करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी नागरिकांना आपण स्वत: या विषयात लक्ष घालू असे आश्वासन दिले.