महागात पडणार अपक्षांची नाराजी

By Admin | Published: July 8, 2015 11:45 PM2015-07-08T23:45:11+5:302015-07-08T23:45:11+5:30

Angered by the fall in the capital | महागात पडणार अपक्षांची नाराजी

महागात पडणार अपक्षांची नाराजी

googlenewsNext
>अग्निशमनवरुन घमासान : परिषदेच्या निवडणुकीत वचपा काढणार
नागपूर : सभापतीपदाच्या निवडणुकीत डावलल्यास डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मनपातील अपक्ष व छोट्या घटक पक्षाचे १५ नगरसेवक नागपूर विकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे. ही नाराजी आघाडीला महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१० जुलैला समितीच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. यात सभापतींची नावे गुरुवारी निश्चित केली जाणार आहे. परंतु अग्निशमन समितीसाठी किशोर डोरले यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना सभापतीपद न मिळाल्यास ते अपक्षासह आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. मनपाच्या आगामी निवडणुकीत भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
अपक्ष नगरसेवक आघाडीतून बाहेर पडल्यास भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेची पुनरावृत्ती मनपात होण्याची शक्यता आहे. मनपातील काही पदाधिकारी वगळता भाजपचे नगरसेवक व कार्यक त्यांर्त नाराजी असतानाच सभापतीपदाच्या मोर्चेबांधणीत काही नेत्यांचाही हस्तक्षेप केल्याने यात पुन्हा भर पडली आहे.
महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीमुळे भाजपच्या तीन उमेदवारांचा पराभव झाला होता. परंतु मनपातील नेत्यांनी यातून बोध घेतलेला दिसत नाही. अपक्ष नगरसेवकांच्या गटाला अग्निशमन व क्रीडा समिती देण्याचे आश्वासन दिले होते. असे असतानाही ओमप्रकाश यादव यांची सभापतिपदी निवड केली जाणार आहे. वास्तविक त्यांची आधीच ४०० कोटीच्या महामंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे डोरले यांचा पत्ता कापल्यास निवडणुकीत बंडखोरी अटळ असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)
चौकट..
गटबाजीमुळे नगरसेवक त्रस्त
मनपातील नागपूर विकास आघाडीतील गटबाजी व काही नेत्यांचा अनावश्यक हस्तक्षेप यामुळे भाजपचे नगरसेवक त्रस्त आहेत. दुसरीकडे मोठे नेते मुंबई-दिल्लीच्या वाऱ्या करण्यात व्यस्त असल्याने आपली व्यथा कुणाकडे मांडावी. असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. यातून सत्तापक्षात नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Web Title: Angered by the fall in the capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.