विरोधकांच्या ऐक्याला सुरुंग, तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी फेडरल फ्रंट गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:54 AM2018-06-19T04:54:37+5:302018-06-19T04:54:37+5:30
विरोधकांच्या ऐक्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागताना दिसत आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सत्ताधारी रालोआमध्ये नसलेल्या अन्य चार मुख्यमंत्र्यांसह काम करायला नकार दिला आहे.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : विरोधकांच्या ऐक्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागताना दिसत आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सत्ताधारी रालोआमध्ये नसलेल्या अन्य चार मुख्यमंत्र्यांसह काम करायला नकार दिला आहे.
चंद्रशेखर राव यांनी प्रादेशिक नेत्यांना घेऊन भाजपेतर व काँग्रेसेतर आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. एन. चंद्रबाबू नायडू एच. डी. कुमारस्वामी, पिनराई विजयन व ममता बॅनर्जी या चार मुख्यमंत्र्यांनी रविवारी महत्वाच्या विषयांवर पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या चौघांना पाठिंबा नसल्याचे सांगायलाही केसीआर यांनी नकार दिला. पटनाईक भाजप व काँग्रेसपासून दूरच आहेत. केसीआर यांच्या फेडरल फ्रंटच्या कल्पनेलाही त्यांनी पाठिंबा दाखवला नव्हता.
चार मुख्यमंत्र्यांसोबत चंद्रशेखर राव नाहीत हे पाहून भाजपचे हृदय आनंदाने भरून आले असावे. काँग्रेसचे अन्य मुख्यमंत्रीही या चौघांपासून चार हात दूरच राहिले. काँग्रेसने हे का केले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
बंगळुरूतील कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ््यालाही केसीआर गैरहजर राहिले. परंतु, यावेळी केसीआर दिल्लीत उपस्थित असूनही चार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गैैरहजर राहिले, हे आश्चर्यजनक आहे. त्यांच्या गैरहजेरीमुळेच विरोधकांत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.